Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्न काही दिवसांवर असताना जवान झाला शहीद, वडिलांना फोन करीत म्हणाला, दोन दहशतवाद्यांना उडवून येतो आणि झाले भलतेच, वाचा सविस्तर रिपोर्ट

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात (Rajouri)  सुरक्षा दल (Indian Army) आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorist Encounter) चकमक झाली होती. उत्तरप्रदेशमधील (UP) अलीगढमधील जवानाने प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले.

  • By युवराज भगत
Updated On: Nov 24, 2023 | 04:50 PM
लग्न काही दिवसांवर असताना जवान झाला शहीद, वडिलांना फोन करीत म्हणाला, दोन दहशतवाद्यांना उडवून येतो आणि झाले भलतेच, वाचा सविस्तर रिपोर्ट
Follow Us
Close
Follow Us:
Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात (Rajouri) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (Indian Army And Terrorist Encounter) चकमक झाली होती. या चकमकीत उत्तरप्रदेशमधील (UP) अलीगढमधील जवानाने प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले. सचिन लौर असे त्या जवानाचे नाव आहे. दहशतवाद्यासोबतच्या चकमकीपूर्वी त्यांनी कुटुंबासोबत फोनवर चर्चा केली होती. इकडे सगळं काही ठिक असल्याचे सांगितले होते. पण, पुढच्याच क्षणाला होत्याचे नव्हते झाले. धक्कादायक म्हणजे, आठ डिसेंबर रोजी सचिन यांचे लग्न होणार होते. ते थोड्याच दिवसांतर सुट्टी घेऊन गावी येणार होता, त्यापूर्वीच त्यांना वीरमरण आले.
लीगढमधील नगरिया गौरोला या गावातील तरुण
सचिन लौर हा अलीगढमधील नगरिया गौरोला या गावातील आहे.  20 मार्च 2019 रोजी सचिन लौर हे आर्मीमध्ये दाखल झाले होते. 2021 मध्ये त्यांनी स्पेशल फोर्समध्ये कमांडो म्हणून पदभार स्विकारला होता. सध्या ते राजौरीच्या पॅरा टू रेजीमेंटमध्ये तैनात होते. सचिनचे मोठे भाऊ विवेक लौर हे नेव्हीमध्ये देशाची सेवा करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सातच्या सुमारास सचिन यांनी भावाला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवला आणि सर्व काही ठीक असल्याचे सांगितले. तो सध्या एका आपरेशनमध्ये आहे. फ्री झाल्यानंतर निवांत बोलूयात, असे म्हटले होते. पण त्यानंतर काहीही बोलणे झाले नाही आणि ही दु:खद बातमी आली.
आठ डिसेंबरला होणार होते लग्न
8 डिसेंबर रोजी सचिनचं लग्न होणार होते. मथुरेच्या जयस्वान गावात राहणाऱ्या एका मुलीशी त्यांचे लग्न ठरले होते. दोन्ही घरात लग्नाची जोरदार तयारी सुरु होती.  घरात आनंदाचे वातावरण होते. दरम्यान, बुधवारी रात्री सचिनने वडील रमेश आणि मोठा भाऊ विवेक यांच्याशी फोनवर बोलून सर्व काही ठीक असल्याचे सांगितले. ऑपरेशन चालू असल्याचेही त्याने सांगितले होते. अजून दोन जण बाकी आहेत, त्यांचा खात्मा करु द्या, त्यानंतर बोलूयात. असे सचिन म्हणाले होते. पण काही वेळाने त्यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना मिळाली.
शेतकरी वडिलांवर दुःखाचा डोंगर
सचिनचे वडील रमेश पेशाने शेतकरी आहेत.  मुलाच्या निधनाच्या बातमीनंतर वडील रमेश आणि आई भगवती देवी स्वत:ला संभाळू शकले नाहीत. शहीद सचिन यांचे पार्थिव शुक्रवारी दुपारपर्यंत त्यांच्या गावी पोहोचेल. संपूर्ण गावात शोकाचे वातावरण आहे. सचिन त्यांच्या तीन भावंडांमध्ये सर्वात लहान होता.
फक्त दोन जण राहिलेत…
सचिनचे वडील रमेश म्हणाले, ‘मला संध्याकाळी फोन आला होता आणि तो म्हणाला की पापा, अजून फक्त दोन जण बाकी आहेत. त्यांचा कायमचा बंदोबस्त केल्यानंतरच येईन. मला काळजी वाटते, असेही मी म्हणालो. त्यावर तो म्हणाला हे सर्व संपवूनच येईन. तुम्ही तयारी करा, मी येतो.’ पण त्यानंतर सकाळी दुःखद बातमी मिळाली. हा प्रकार घडल्याचे त्याच्या मित्राने सांगितले. सकाळी सव्वा सातच्या सुमारास काही मेसेजही पाठवले.
सचिनची वागणूक खूप चांगली
गावातील लोकांनी सांगितले की, सचिनची वागणूक खूप चांगली होती आणि गावातील प्रत्येकासोबत प्रेमाने बोलायचा तो सैन्यात भरती झाला आणि नंतर कमांडो झाला. खूप कष्टाळू मुलगा होता. लग्नासाठी बोलावले असता पापा लवकरच येतील असे सांगितले. लग्नाला अजून 14 दिवस बाकी आहेत मी येईन, असे म्हणाला होता.

Web Title: Marriage on 8th fathers call to son at border jawan said two terrorists are blown away next day indias hero martyred himalayas lol nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2023 | 04:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.