Mata sita new temple at birth place bihar sitagadhi Amit Shah start work
Bihar Mata Sita Mandir : पटना : मागील वर्षी प्रभू श्री रामांचे भव्य मंदिर उभारण्यात आले. श्री रामांची जन्मभूमी असलेल्या अध्योध्येमध्ये हे मंदिर उभारण्यात आले. संपूर्ण भारतामध्ये आणि जगातील हिंदू बांधवांकडून या अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळ्याचा उत्सव साजरा करण्यात आला. यानंतर प्रभू रामांनंतर देवी सीतेचे देखील मंदिर उभारले जाणार आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे.
देवी सीतेचे जन्मस्थळ मानण्यात येणाऱ्या बिहारमध्ये हे देवी सीतेचे मंदिर उभारण्यात येणार आहे. आज (दि.08) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला आहे. या मंदिर निर्माण कार्यामध्ये सीता मातेच्या जन्मस्थळाचे नूतनीकरण करून एक नवा अध्याय सुरु केला जाणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली या सीता मंदिराचे बांधकाम केले जाणार आहे. बिहारमधील सीतामढी येथे देवी सीतेचे एक अद्भुत मंदिर बांधले जाणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. भगवान रामानंतर, सीता मातेच्या जन्मस्थळाचे पुनरुज्जीवन ही केवळ राज्य पातळीवरच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही अभिमानाची बाब आहे, अशा भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली आहे. बिहार राज्यातील पुनौरधाम येथे बांधल्या जाणाऱ्या माता सीतेच्या मंदिराच्या बांधकामासाठी लवकरच ६७ एकर जागेवर बांधकाम सुरू होणार आहे.
मंत्रांच्या जपाने पायाभरणी सोहळा
बिहार सरकारने आज मोठ्या उत्साहात माता सीतेचा जन्म झाला त्या भूमीची पूजा करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रसंगी गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री आणि बिहारचे सर्व मंत्री एकत्रित उपस्थित आहेत. यावेळी पवित्र जपनामाने परिसर मंत्रमुग्ध झाला होता. भक्तीमय वातावरणामध्ये माता सीतेच्या मंदिराच्या बांधकामाची पायाभरणी केली गेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भूसंपादनाचे काम आधीच पूर्ण झाले आहे. आता लवकरच माता सीतेच्या भव्य मंदिर संकुलासाठी (६७ एकर) जमिनीवर बांधकाम सुरू होईल. बिहारचे हे पर्यटन स्थळ प्रत्येक स्तरावर निविदा जारी करून त्याचे बांधकाम सुरू करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहे.
जय माँ जानकी 🙏
कल का दिन पूरे देश और विशेषकर मिथिलांचल के लिए अत्यंत सौभाग्य और हर्ष का दिन है, जब बिहार के सीतामढ़ी स्थित माता सीता की जन्मभूमि में पवित्र ‘पुनौराधाम मंदिर’ एवं परिसर के समग्र विकास की वृहद योजना का शिलान्यास होगा।
साथ ही, यहाँ आने वाले श्रद्धालुओं की सुविधा…
— Amit Shah (@AmitShah) August 7, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बिहारचे हे देवी सीतेचे मंदिर पर्यटन विभाग अवघ्या ११ महिन्यांत मंदिर बांधकामाची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. माता सीतेचे जन्मस्थान बिहारमधील सीतामढी येथील पुनौरधाम येथे आहे. हे स्थान हिंदू समाजामध्ये जागतिक स्तरावर प्रसिद्ध असून अतिशय पूजनीय मानले जाते. परंतु आजही माता सीतेच्या या जन्मस्थळाला ते अस्तित्व आणि प्रसिद्धी मिळालेली नाही जे त्याला खरोखरच पात्र आहे. मोदी सरकारकडून माता सीतेचे हे मंदिर उभारण्यासाठी पूर्ण अर्थिक सहाय्य केले जाणार आहे. अमित शहा आणि भाजप सरकार युद्धपातळीवर ८८२ कोटी खर्चाचे माता मंदिर बांधण्यास तयार आहेत अशा भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.