Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “…हे आपले कर्तव्य”; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर अमित शहांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत सुनील तटकरे, प्रफुल पटेल, पार्थ पवार, जय पवार  आणि अन्य वरिष्ठ नेते देखील असल्याचे समोर आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 11, 2026 | 08:12 PM
Maharashtra Politics: “…हे आपले कर्तव्य”; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर अमित शहांची प्रतिक्रिया
Follow Us
Close
Follow Us:

सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला उपमुख्यमंत्री पदभार 
सुनेत्रा पवारांनी घेतली पंतप्रधान मोदी अन् अमित शहांची भेट 
अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांचा पहिलाच दिल्ली दौरा

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सर्वाधिकार देखील सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहेत. दरम्यान सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आज त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत सुनील तटकरे, प्रफुल पटेल, पार्थ पवार, जय पवार  आणि अन्य वरिष्ठ नेते देखील असल्याचे समोर आले आहे. सुनेत्रा पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काय ट्वीट केले आहे ते, जाणून घेऊयात.

अमित शहा यांचे ट्वीट काय?

मी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. आपले दिवंगत स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून काढणे सोपे नाही.

महाराष्ट्र की उपमुख्यमंत्री @SunetraA_Pawar जी से भेंट हुई।
हम सबके प्रिय स्व. अजीत पवार जी के जाने से महाराष्ट्र की राजनीति में जो रिक्तता आई है, उसे भरना आसान नहीं है, पर जनकल्याण और प्रदेश के विकास के उनके विजन को साकार करना हम सभी का साझा कर्त्तव्य है, जिसमें आपका संकल्प बहुत… pic.twitter.com/g1Hz4WeYpf
— Amit Shah (@AmitShah) February 11, 2026

तथापि, राज्याच्या कल्याण आणि विकासाचे त्यांचे स्वप्न साकार करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. ज्यामध्ये तुमचा संकल्प खूप उपयुक्त ठरेल.

पार्थ पवारांना राज्यसभा मिळण्याची शक्यता

अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार राज्यातील राजकारणामध्ये उतरल्या आहेत. त्यामुळे राज्यसभा खासदारकीचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या जागी त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे. या दृष्टीने देखील सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पार्थ पवारांच्या राजकीय भविष्याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू,” नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले… 

12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने पहिले स्थान पटकावले, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला. यापूर्वी, भाजपने महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीत विक्रमी जागा जिंकून लक्षणीय यश मिळवले होते. 731 जिल्हा परिषदेच्या जागांपैकी भाजपकडे सर्वाधिक 233 सदस्य निवडून आले आहेत. त्यानंतर अजित पवार गट 167 जागांसह दुसऱ्या जागेवर आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये मोठा भाऊ जरी भाजप असला तरी अजित पवार गट देखील तितकाच महत्त्वाचा पक्ष असल्याचे अधोरेखित झाले.

 

Web Title: Home minister amit shah tweet after meet maharashtra dcm sunetra pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • Maharashtra Politics
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?
1

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?

अमित शाहांच्या ‘रोड शो’ने फिरणार वारे? ममता दीदींच्या घराजवळ रॅलीला हिंसक वळण, चपला फेकल्या अन्..
2

अमित शाहांच्या ‘रोड शो’ने फिरणार वारे? ममता दीदींच्या घराजवळ रॅलीला हिंसक वळण, चपला फेकल्या अन्..

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा गुवाहटी वारी होणार? 50 आमदार भाजपमध्ये जाणार,बड्या नेत्याचा दावा
3

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा गुवाहटी वारी होणार? 50 आमदार भाजपमध्ये जाणार,बड्या नेत्याचा दावा

Pune Exclusive: एकनाथ शिंदेंचा OSD असल्याचे भासवले…; पोलिसांनी अशी खोड मोडली
4

Pune Exclusive: एकनाथ शिंदेंचा OSD असल्याचे भासवले…; पोलिसांनी अशी खोड मोडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.