“लक्षद्विपमध्ये भरलेय अप्रतिम सौंदर्य; हम आत्मनिर्भर है….”; महानायक अमिताभ बच्चन यांनी मालदीवच्या मंत्र्यांना सुनावले

  Maldives Ministers Controversy Amitabh Bachchan Post : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपला गेले होते. तेथील काही फोटोही त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यावरुन वेगळाच वाद समोर आला आहे. काही नेत्यांनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रियांनी त्याला वेगळेच स्वरुप प्राप्त झाले आहे. त्या वादात बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनीही उडी घेतली आहे.
  मालदीवच्या मंत्र्यांना चांगलेच सुनावले
  अशातच बॉलीवूडचे बिग बी महानायक अमिताभ बच्चन यांनी लक्षद्वीप वर पोस्ट करत दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. या अगोदर बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी लक्षद्वीप प्रकरणावर केलेल्या पोस्टनं मोदींना समर्थन केलं होतं. ज्या नेत्यानं मोदींच्या विरोधात प्रतिक्रिया दिली होती त्या देशातील इतर पक्षाच्या नेत्यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. या सगळ्यात बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी परखडपणे मालदीवच्या मंत्र्यांना चांगलेच सुनावले आहे.

  मालदीवचे मंत्री फारच उद्धट दिसतात
  मालदीवच्या ऐवजी लक्षद्वीप आणि अंदमानला जाण्याबाबत आग्रही असणाऱ्यांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. ते नाव म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांचे आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी पोस्ट करत तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यापूर्वी वीरेंद्र सेहवागनं देखील त्या प्रकरणावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली होती. मालदीवचे मंत्री फारच उद्धट दिसतात. त्यामुळेच त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करण्याचे धाडस केले.
  बिग यांची ती पोस्ट ही आता चर्चेत
  अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे की, आम्ही आत्मनिर्भर आहोत. आणि खबरदार आमच्या आत्मनिर्भरतेवर कोणत्याही प्रकारे घाला घालण्याचा प्रयत्न केला तर, बिग यांची ती पोस्ट ही आता चर्चेत आली आहे. त्यामध्ये त्यांना नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्सही भन्नाट आहेत. त्यात अनेकांनी मालदीव ऐवजी जगभरामध्ये अनेक पर्यटन स्थळं असल्याचे म्हटले आहे.
  अमिताभ यांनी यावेळी सेहवागचे ते ट्विट रिपोस्ट केले आहे. आणि आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, वीरु पाजी, हीच खरी वेळ आहे. आपली भूमी एवढी सुंदर आहे की आपण त्याचा आदर करायला हवा. मी अनेकदा लक्षद्वीप आणि अंदमानला गेलो आहे. ते खूपच सुंदर आहे. प्रेक्षणीय आहे. आपण भारतीय आहोत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आत्मनिर्भर आहोत. त्यावर घाला घालण्याचा प्रयत्न करु नका. असे बिग बी यांनी म्हटले आहे.