Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वितळणारे ग्लेशियर लडाखमध्ये आणू शकतात विनाश : पॅंगॉन्गमधील तलाव फुटल्यास अचानक पूर येण्याचा धोका, परिसरातील पाण्याचे स्रोतही येऊ शकतात संपुष्टात

काश्मीर विद्यापीठाच्या जिओइन्फॉरमॅटिक्स विभागाने हे संशोधन केले आहे. संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावणारे सहाय्यक प्राध्यापक डॉ. इरफान रशीद यांनी सांगितले की, आम्ही १९९० ते २०२० पर्यंतच्या ८७ ग्लेशियरच्या उपलब्ध उपग्रह डेटाचा अभ्यास केला आहे. ग्लेशियर वितळल्यामुळे पॅंगॉन्गसह अनेक तलावांच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तलावांचा विस्तार होत असून ते फुटण्याचा धोका वाढला आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Feb 13, 2022 | 06:50 PM
वितळणारे  ग्लेशियर लडाखमध्ये आणू शकतात विनाश : पॅंगॉन्गमधील तलाव फुटल्यास अचानक पूर येण्याचा धोका, परिसरातील पाण्याचे स्रोतही येऊ शकतात संपुष्टात
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : लडाखच्या पॅंगॉन्ग भागात ग्लेशियर वेगाने वितळत आहेत. १९९० पासून, ६.७% ग्लेशियरचे आवरण वितळले आहे. काश्मीर विद्यापीठाच्या एका नव्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. ग्लेशियरचे असे आकुंचन हे चांगले लक्षण नाही. यामुळे स्थानिक नागरिकही चिंतेत आहेत.

काश्मीर विद्यापीठाच्या जिओइन्फॉरमॅटिक्स विभागाने हे संशोधन केले आहे. संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावणारे सहाय्यक प्राध्यापक डॉ. इरफान रशीद यांनी सांगितले की, आम्ही १९९० ते २०२० पर्यंतच्या ८७ ग्लेशियरच्या उपलब्ध उपग्रह डेटाचा अभ्यास केला आहे. ग्लेशियर वितळल्यामुळे पॅंगॉन्गसह अनेक तलावांच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तलावांचा विस्तार होत असून ते फुटण्याचा धोका वाढला आहे.

पॅंगॉन्ग लेक संपेल
अभ्यासानुसार, ग्लेशियर दरवर्षी ०.२३% ने कमी होत आहेत. प्राध्यापकांनी सांगितले की महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅंगॉन्ग सरोवर या ग्लेशियरने भरलेले आहे. ते नाहीसे झाले तर तलावातील पाणी संपेल आणि तेही नाहीसे होईल. या ग्लेशियरचे वितळणे या वर्षाच्या शेवटपर्यंत सुरूच राहणार आहे.

बर्फाशी निगडीत आहे शेतकऱ्यांचे जीवन
स्थानिक रहिवासी दोर्जे आंगचुक यांनी सांगितले की, अनेक शेतकरी डोंगरावरील बर्फ आणि हिमनगाचे पाणी सिंचनासाठी वापरतात. त्यामुळे त्यांंना शेती करणे शक्य होते. लडाखमध्ये आधीच पाण्याची टंचाई आहे. हिमनद्याही कमी झाल्यास पाणीटंचाई अनेक पटींनी वाढण्याची भीती आहे.

लडाखच्या अर्थव्यवस्थेला धोका
दोरजे यांनी निदर्शनास आणले की ग्लेशियर वितळल्याने पर्यावरण आणि लडाखची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे, जी गेल्या अनेक दशकांपासून पर्यटकांवर अवलंबून आहे. Pangong तलाव ४,३५० मीटर उंचीवर आहे. हे जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. ज्याचे सौंदर्य लोकांना आकर्षित करते. सुमारे १६० किमी पसरलेल्या, पॅंगॉन्ग सरोवराचा एक तृतीयांश भाग भारतात आहे आणि उर्वरित दोन तृतीयांश चीनमध्ये आहे. दरवर्षी अनेक पर्यटक लडाखला फक्त पाहण्यासाठी येतात.

पॅंगॉन्ग वाचवण्यासाठी हे उपाय करावे लागतील
हा त्रास टाळण्यासाठी आम्हाला काही उपाय करावे लागतील, असे या अभ्यासात सहकारी असलेले प्राध्यापक इरफान यांनी सांगितले. सर्व प्रथम, संपूर्ण परिसरात सुरू असलेली कामे, लोकांची गर्दी, यंत्रांचा वापर, वाढणारे कार्बन उत्सर्जन हे सर्व थांबवावे लागेल. पेट्रोल आणि डिझेलऐवजी सौर ऊर्जा आणि सीएनजीचा वापर करावा लागणार आहे. पर्यावरणानुसार काम करावे लागेल.

प्रशासनही करत आहे उपाययोजना
लडाखचे प्रशासकीय सचिव रविंदर कुमार म्हणाले की, येत्या पाच वर्षांत या प्रदेशाचे पर्यावरणीय संवर्धन करण्याचे सरकारचे नियोजन आहे. या अंतर्गत, आम्ही नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) च्या मदतीने ग्रीन हायड्रोजन स्थापित करू. जर तो यशस्वी झाले, तर पथदर्शी प्रकल्प वाढवला जाईल आणि वाहतूक क्षेत्राला हरित बनवण्यात त्याचा फायदा होईल.

Web Title: Melting glaciers can bring destruction in ladakh there is a risk of sudden floods due to bursting of lakes in pangong water sources in the area may also end

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2022 | 06:50 PM

Topics:  

  • Ladakh
  • Melting glaciers

संबंधित बातम्या

सिंधू जल करारानंतर पाकिस्तानसाठी आणखी एक वाईट बातमी; हिंदू कुश हिमालयातील 75% हिमनद्या धोक्यात
1

सिंधू जल करारानंतर पाकिस्तानसाठी आणखी एक वाईट बातमी; हिंदू कुश हिमालयातील 75% हिमनद्या धोक्यात

Switzerland Glacier Collapse : हिमकडा कोसळला, अख्खं गाव मलब्यात बुडालं; तरीही बचावले गावकरी, पाहा भयावह VIDEO
2

Switzerland Glacier Collapse : हिमकडा कोसळला, अख्खं गाव मलब्यात बुडालं; तरीही बचावले गावकरी, पाहा भयावह VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.