Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MIG 21 Retirement: भारताचा ‘बादशाह’ निवृत्त! मिग-21 ने अनेकदा पाकड्यांना चारली धूळ; पहा Video

तब्बल 60 वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर मिग - 21 आज निवृत्त झाले आहे. आज चंदीगड एअरबेसवर मिग 21 ने अखेरचे उड्डाण घेतले. मिग 21 च्या अखेरच्या उड्डाणाचे नेतृत्व स्क्वाड्रन लीडर प्रिया शर्मा यांनी केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 26, 2025 | 03:07 PM
MIG 21 Retirement: भारताचा 'बादशाह' निवृत्त! मिग-21 ने अनेकदा पाकड्यांना चारली धूळ; पहा उड्डाणाचा Video

MIG 21 Retirement: भारताचा 'बादशाह' निवृत्त! मिग-21 ने अनेकदा पाकड्यांना चारली धूळ; पहा उड्डाणाचा Video

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय हवाई दलाची ताकद होते मिग – 21 
मिग -21 ची जागा तेजस लढाऊ विमान घेणार 
स्क्वाड्रन लीडर प्रिया यांनी केले मिग-21 च्या अखेरच्या उड्डाणाचे नेतृत्व

Indian Air Force: आज भारतीय वायू सेनेसाठी अत्यंत खास असा क्षण आहे. भारतीय वायुसेनेतील अत्यंत महत्वाचे असलेले मिग-21 हे लढाऊ विमान आज निवृत्त झाले आहे. भारतीय वायुसेनेत मिग – 21 या लढाऊ विमानाचे अत्यंत महत्वाचे योगदान आहे. अनेक महत्वाच्या कारवायांमध्ये मिग 21 ने महत्वपूर्ण योगदान दिले आहे. भारतीय संरक्षणदलाची ताकद असणारे मिग-21 आज निवृत्त झाले आहे.

तब्बल 60 वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर मिग – 21 आज निवृत्त झाले आहे. आज चंदीगड एअरबेसवर मिग 21 ने अखेरचे उड्डाण घेतले. मिग 21 च्या अखेरच्या उड्डाणाचे नेतृत्व स्क्वाड्रन लीडर प्रिया शर्मा यांनी केले. मिग-21 चे उड्डाण करणाऱ्या त्या शेवटच्या पायलट ठरल्या आहेत. 1960 च्या दशकापासून मिग 21 भारताची सेवा करत आले आहे.

CULMINATION OF MIG-21 OPERATION IN IAF https://t.co/jqqywWowrY — Indian Air Force (@IAF_MCC) September 26, 2025

इंडियन एअर फोर्सच्या मिग 21 लढाऊ विमानाने अनेक महत्वाच्या कारवायांमध्ये भाग घेतला आहे. तब्बल 60 वर्षांच्या सेवेनंतर हे लढाऊ विमान निवृत्त झाले आहे. या लढाऊ विमानाचा निवृत्ती सोहळा चंदीगड एअरबेसवर पार पडला. या कार्यक्रमाला सरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.

मिग 21 लढाऊ विमानाने अनेक महत्वाच्या युद्धांमध्ये योगदान दिले आहे. 1965 च्या युद्धात भारताच्या मिग 21 या लढाऊ विमानाने महत्वाची भूमिका बजावली होती. 1971 च्या युद्धात हे लढाऊ विमान पाकिस्तानसाठी अत्यंत घातक ठरले. कारगिल युद्धात देखील मिग 21 ने पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केले होते.

2019 मध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पुलवामा हल्ला घडवून आणला. यामध्ये भारतीय लष्कराचे अनेक जवान शहीद  झाले होते. या भ्याड हल्ल्याचा बदला भारताने घेतला होता. भारताने पाकिस्तानवर हवाईहल्ला केला. बालाकोटमध्ये घुसून मिग 21 ने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते.

Tejas Mk-1A Jets: भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार; एचएएलसोबत ९७ ‘तेजस’ फायटर जेटसाठी मेगा डील

मिग 21 ची जागा कोण घेणार?

भारताचे मिग 21 लढाऊ विमान आज निवृत झाले आहे. दरम्यान आता या लढाऊ विमानाची जागा कोण घेणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर तेजस हे भारताचे अत्याधुनिक लढाऊ विमान आता मिग 21 ची जागा घेणार आहे. तेजस हे भारताच्या अत्यंत घातक आणि अत्याधुनिक असे फायटर जेट आहे.

भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने (MoD) गुरुवारी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबत एक ऐतिहासिक करार केला आहे. या करारानुसार, भारतीय वायुसेनेसाठी ९७ स्वदेशी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजस एमके१ए (Mk1A) विमानांची खरेदी केली जाणार आहे. या कराराची एकूण किंमत ६२,३७० कोटी रुपये (कर वगळून) आहे. यात ६८ सिंगल-सीटर लढाऊ विमाने आणि २९ ट्विन-सीटर ट्रेनर विमानांचा, तसेच संबंधित उपकरणे आणि सपोर्ट सिस्टीमचा समावेश आहे.

 

Web Title: Mig 21 will bid farewell to indian air force squadron leader priya sharma will fly the last flight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Indian Air Force
  • Indian Armed Forces

संबंधित बातम्या

Operation Sindoor: पाकिस्तानचा खोटा इतिहास पसरवण्याचा कट; पाकिस्तानी शाळांमध्ये शिकवणार ‘ऑपरेशन सिंदूर’ चे दिशाभूल करणारे धडे
1

Operation Sindoor: पाकिस्तानचा खोटा इतिहास पसरवण्याचा कट; पाकिस्तानी शाळांमध्ये शिकवणार ‘ऑपरेशन सिंदूर’ चे दिशाभूल करणारे धडे

Tejas Mk-1A Jets: भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार; एचएएलसोबत ९७ ‘तेजस’ फायटर जेटसाठी मेगा डील
2

Tejas Mk-1A Jets: भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार; एचएएलसोबत ९७ ‘तेजस’ फायटर जेटसाठी मेगा डील

‘बलिदान व्यर्थ जाणार नाही’, शाहबाजने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; UNGC मध्ये Kashmir मुद्दा उचलून धरणार
3

‘बलिदान व्यर्थ जाणार नाही’, शाहबाजने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; UNGC मध्ये Kashmir मुद्दा उचलून धरणार

India-Pak War : जर भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर Saudi देखील सहभागी होणार का? तज्ञांनी सांगितले करारांमागील सत्य
4

India-Pak War : जर भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर Saudi देखील सहभागी होणार का? तज्ञांनी सांगितले करारांमागील सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.