जम्मू-काश्मीरच्या नौशेरामध्ये भीषण स्फोट; ६ जवान जखमी
जम्मू -काश्मीरमधील नौशेरा येथे भूसुरुंगाचा स्फोट झाला असून यात लष्कराचे ६ जवान जखमी झाले आहेत. भवानी सेक्टरमधील माकडी भागात स्फोट झाला. जखमी जवानांना उपचारासाठी राजौरी येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.हा अपघात आज म्हणजेच १४ जानेवारी रोजी सकाळी १०.४५ वाजता घडला. ही घटना घडली तेव्हा ५/३ गोरखा रायफल्स (GR) ची एक तुकडी खांबा किल्ल्याजवळ गस्त घालत होती.
जखमी जवान
१. हवालदार एम. गुरुंग (४१)
२. हवालदार जे. थप्पा (४१)
३. हवालदार जंग बहादूर राणा (४१)
४. हवालदार आर. राणा (३८)
५. हवालदार पी. बदर राणा (३९)
६. हवालदार व्ही. गुरुंग (३८)
९ डिसेंबर २०२४ रोजी जम्मूतील पूंछ येथे स्फोट झाला होता, ज्यामध्ये एक जवान शहीद झाला होता. पूंछमधील ठाणेदार टेकरी येथे गस्त घालत असताना भूसुरुंग स्फोटात २५ राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार व्ही. सुब्बैया वारीकुंता यांचा मृत्यू झाल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली होती. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टनमधील पलहल्लन भागात एक आयईडी निकामी करण्यात आला होता पाटणमधील पलहल्लनमध्ये सुरक्षा दलांना आयईडी आढळून आला. घटनास्थळी बॉम्ब निकामी पथक (बीडीएस) पाठवण्यात आले आणि आयईडी निकामी करण्यात आला.
ऑक्टोबर २०२४ मध्येही कुपवाडा येथे एका खाणीत स्फोट झाला होता, ज्यामध्ये २ लष्करी जवान जखमी झाले होते. पहाटे ३ वाजता त्रेहगाम येथील नियंत्रण रेषेवर (एलओसी) सैनिक गस्त घालत असताना हा स्फोट झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.
रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध सुरू असून आतापर्यंत हजारो सैनिक व दोन्ही बाजूच्या हजारो नागरिकांनी प्राण गमावले आहेत. दरम्यान, या युद्धात एका भारतीय तरुणाचाही मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचं नाव बिनिल टी. बी. असं असून तो ३२ वर्षांचा होता. बिनिल केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथील रहिवासी होता. तर जैन टी. के. (वय २७) हा तरुण जखमी झाला आहे.
काही दिवसांपूर्वी बिनिलच्या कुटुंबीयांना माहिती मिळाली होती की एका ड्रोन हल्ल्यात केरळमधील दोन तरूण गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर बिनिलच्या कुटुंबाने अधिक माहिती मिळवण्याचा व बिनिलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना बिनिलची माहिती मिळाली नाही, तसेच त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही.
बिनिल व जैन यांचे नातेवाईक सतीश यांनी दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की बिनिलची पत्नी जोसी मॉस्कोमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे. तिला दूतावासाकून अधिकृतरित्या बिनिलच्या निधनाचं वृत्त मिळालं आहे. रशियन सैन्याच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.