Operation Sindoor: "काश्मीर प्रकरणात आम्हाला..."; परराष्ट्र मंत्रालयाने अन्य देशांना सुनावले
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उडवून लावले. त्यानंतर आज परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. यामध्ये अनेक गोष्टींवर भाष्य करण्यात आले. काश्मीर प्रकरणात आम्हाला इतरांची मध्यस्थी मान्य नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे स्पष्ट केले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी म्हणाले, “भारताने पाकिस्तानमधील भावलपूर आणि अन्य दहशतवादी ठिकाणांना उद्ध्वस्त केले. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. भारत पाकिस्तानमधील सिंधु जल करार हा स्थगितच असणार आहे.”
“काश्मीरचा मुद्दा द्विपक्षीय पद्धतीनेच सोडवले जातील. पाकिस्तानकडून पुन्हा हल्ला झाल्यास भारत चोख प्रत्युत्तर देणार. टीआरएफ या संघटनेला दहशतवाद्यांच्या यादीत टाकावे. भारत आणि अमेरिकेत व्यापाराचा मुद्दा चर्चेत नव्हता. भारत अणुहल्ल्याची धमकी सहन करणार नाही. पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर रिकामे करावे”, अशी मागणी सरकारने केली आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष यांच्यात चर्चा झाली होती. यामध्ये व्यापाराचा मुद्दा चर्चेत नव्हता. पाकिस्तानने गोळी चलवल्यास त्याचे उत्तर गोळीनेच दिले जाईल. 10 मे रोजी भारताने पाकिस्तानचे एअरबेस उद्ध्वस्त केले. एअरबेस नष्ट झाल्यावर पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेतली.”
पाकिस्तानला धूळ चारायला भारत-रशिया सज्ज
रशियाने भारताला एस-500 एअर डिफेंन्स सिस्टिमचा प्रस्ताव ठेवल्याचे समजते आहे. एस-500 एअर डिफेंन्स सिस्टिम रशियाची जगातील सर्वात प्रगत शस्त्र प्रणाली आहे. ही सिटीम 600 किमी दूर असलेले ड्रोन, मिसाईल, हायपरसोनिक मिसाईल नष्ट करू शकते. ही सिस्टिम एस -400 पेक्षा अधिक प्रगत आहे. ही सिस्टिम अधिक वेगवान, अचूक आणि आधुनिक आहे.
भारत आणि रशिया हे दोन्ही देश जून मित्रहेत. दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. भारताला एस-400 च्या करारात अनेक युनिट्स रशियाने दिली आहेत. भारत पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला असताना रशियाने हा ठेवलेला प्रस्ताव अधिक चर्चेत आहे. दरम्यान यावर भारत सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
‘दो भाई दोनो तबाही’; पाकिस्तानला धूळ चारायला भारत-रशिया सज्ज, ‘S-500’ मुळे भरली धडकी!
भारत पाकिस्तान सबंध ताणले गेले असताना रशियाने हा ठेवलेला प्रस्ताव महत्वाचा समजला जात आहे. अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नसली तरी देखील यावर सरकारने चर्चा सुरू केली असल्याचे म्हटले जात आहे.
तर आम्ही घरात घुसून मारणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी
आदमपूर एअरबेसवरुन बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तुमच्या पराक्रमामुळे ऑपरेशन सिंदूरचे यश जगभरात पोहोचले. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल मी देशाच्या सशस्त्र सलाम करतो. येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही प्रेरणा ठरला आहात. भारत गौतम बुद्धांची आहे तशीच गुरु गोविंदसिंग यांची देखील भूमी आहे. प्रत्येक नागरिक जवानांसोबत आहेत.”