modi adani bhai bhai in rajyasabha by congress
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी Rahul Gandhi) यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तसेच उद्योगपती गौतमी अदानी यांच्यात संबंध आहेत. गौतमी अदानी (Gautam Adani) यांनी गेल्या २० वर्षांत भाजपाला अनेकदा पैसे दिले, असा गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली असून त्याचे पडसाद संसदेतही उमटले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विरोधक अदानींचा मुद्दा घेऊन आक्रमक झाले आहेत. आजदेखील त्याचे पडसाद राज्यसभेत पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणाला उभे राहिल्यानंतर विरोधकांनी राज्यसभेत गदारोळ केला. विरोधकांनी सभागृहात ‘मोदी-अदानी भाई भाई’(Modi Adani Bhai Bhai) अशा घोषणा दिल्या.
#WATCH | Opposition MPs raise slogans of “Modi-Adani bhai-bhai” in Rajya Sabha as PM Modi replies to Motion of Thanks on President’s address pic.twitter.com/Kzuj2LJKPZ
— ANI (@ANI) February 9, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर बोलण्यासाठी उभे राहिले होते. मोदी यांनी भाषणाला सुरुवात करताच विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला. मोदी यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर विरोधी बाकावरील राज्यसभा सदस्यांनी ‘मोदी-अदानी भाई भाई, जी फॉर जेपीसी’ अशा घोषणा केल्या. एकीकडे मोदी यांचे भाषण सुरू असताना विरोधकांनी या घोषणाबाजींनी सभागृह दणाणून सोडले. विरोधकांच्या या आक्रमकपणामुळे मोदी यांना भाषण करताना अडथळा निर्माण झाला. मात्र तरीदेखील मोदी सभापतींना उद्देशून भाषण करत राहिले.
[read_also content=”पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरणात पंढरीनाथ आंबेरकरवर खुनाचा गुन्हा दाखल, सात दिवसांची पोलीस कोठडी, अपघात घातपात असल्याचा संशय https://www.navarashtra.com/maharashtra/police-custody-to-pandharinath-amberkar-in-shashikant-warise-death-case-nrsr-368493/”]
मोदी भाषणासाठी उभे राहिल्यानंतर विरोधकांनी भाषणबाजी बंद करा, अदानी, एलआयसीवर बोला, असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच गौतम अदानी मुद्यावर संयुक्त संसदीय समितीची(जेपीसी) स्थापना करण्याचीही मागणी केली.