Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत अग्रणी राज्य बनणार असून अणुऊर्जेपासून वीज निर्मितीत सहभागी महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. २०४७ पर्यंत स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी रोडमॅप तयार करणार आहेत.

  • By Priti Hingane
Updated On: Nov 18, 2025 | 04:56 PM
Maharashtra Clean Energy Mission

Maharashtra Clean Energy Mission

Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत अग्रणी राज्य बनणार
  • महाराष्ट्र वीज निर्मितीत सहभागी होणारे पहिले राज्य
  • २०४७ पर्यंत स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी रोडमॅप
Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत अग्रणी राज्य बनणार असून अणुऊर्जेपासून वीज निर्मितीत सहभागी महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने महाराष्ट्राने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असून अणुऊर्जेचा वापर ऊर्जा निर्मिती करताना या क्षेत्रात राज्यांचा सहभाग घेण्यासाठी केंद्र सरकार पावलं टाकत अणुऊर्जेपासून वीज निर्मिती उपक्रमामध्ये सहभागी होणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरत आहे, असल्याचे गौरवोद्वार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (महाजनको) आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल) यांच्यात सामंजस्य करार संपन्न झाला. महाराष्ट्रात जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध झाला. त्यानंतरही काही प्रकल्प प्रस्तावित होते. पण, विरोधामुळे ते रखडले. अणुऊर्जेला पर्याय नसल्याने महाराष्ट्र आता देशात सर्वात मोठे अणुऊर्जा निर्मिती करणारे राज्य म्हणून पुढे येत आहे.

हेही वाचा : Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” देश जलद गतीने विकसित होत आहे आणि विकासाचा मुख्य आधार म्हणजे स्वच्छ व विश्वासार्ह ऊर्जा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी स्वच्छ ऊर्जा-सक्षम राष्ट्र धोरणामुळे अणुऊर्जातून वीज निर्मितीसाठी राज्यांचा सहभाग वाढविला जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आतापर्यंत अणुऊर्जा क्षेत्र हे केंद्र सरकारचे कार्यक्षेत्र होते. परंतु महाजनको प्रथमच एनपीसीआयएलसोबत या उपक्रमात सहभागी होत आहे. हा सामंजस्य करार अत्यंत योग्य वेळी झाला आहे.

डेटा सेंटरचे सर्वांत महत्त्वाचे इंधन म्हणजे स्वच्छ ऊर्जा आणि त्यासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र ही देशाची ‘डेटा सेंटर कॅपिटल’ बनत आहे. जवळपास ५० ते ६० टक्के डेटा सेंटर क्षमता महाराष्ट्रात असून ती सातत्याने वाढत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा : ज्वेलरी उद्योगात क्रांती! मुंबईत उभारणार जगातील सर्वात मोठा ‘ज्वेलरी’ हब..; काय आहे रत्ने-दागिने धोरण 2025?

२०४७ पर्यंत स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी रोडमॅप तयार करण्यात येणार आहे. सध्याच्या वीज निर्मिती तंत्रज्ञानामध्ये पारंपारिक जीवाश्म इंधन आणि नैसर्गिक स्रोतांसह पर्यावरणीय परिणाम करणारे घटक आहेत. जीवाश्म इंधन (कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू) हे जागतिक विजेचे प्रमुख स्रोत राहिले आहेत, परंतु त्यांच्या वापरामुळे हवा आणि जल प्रदूषण, पॉवर प्लांट उत्सर्जनामुळे होणारे वातावरणातील परिणाम, संसाधनांचा हास व कचरा विल्हेवाट यातील धोके समोर आलेले आहेत.

भारताचे २०४७ पर्यंत ३० ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यासाठी त्याच्या ऊर्जा क्षेत्रात मोठे बदल आवश्यक असून. वाढत्या वीज मागणीची पूर्तता करण्यासाठी आणि २०७० पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्यासाठी, कमी जीवनचक्र कार्बन उत्सर्जन होईल. २४ तास विद्युत निर्मितीमुळे अणुऊर्जा महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.

Web Title: Maharashtra will lead the country in clean energy historic step in nuclear energy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 04:56 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • electricity
  • maharashtra
  • PM Narendra Modi
  • solar energy

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
1

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

ज्वेलरी उद्योगात क्रांती! मुंबईत उभारणार जगातील सर्वात मोठा ‘ज्वेलरी’ हब..; काय आहे रत्ने-दागिने धोरण 2025?
2

ज्वेलरी उद्योगात क्रांती! मुंबईत उभारणार जगातील सर्वात मोठा ‘ज्वेलरी’ हब..; काय आहे रत्ने-दागिने धोरण 2025?

‘परीक्षा निकालानंतर ४ दिवसांत नियुक्तीपत्रे द्या; तर जानेवारीपर्यंत…; शासकीय सेवेत सुधारणांसाठी मुख्यमंत्र्यांचे मोठे निर्देश
3

‘परीक्षा निकालानंतर ४ दिवसांत नियुक्तीपत्रे द्या; तर जानेवारीपर्यंत…; शासकीय सेवेत सुधारणांसाठी मुख्यमंत्र्यांचे मोठे निर्देश

Ladki Bahin KYC: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत असणार अंतिम मुदत
4

Ladki Bahin KYC: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत असणार अंतिम मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.