Rain Update: गेल्या काही दिवसांमध्ये देशातील अनेक राज्यात अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. मात्र आता देशवासीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नागरिकांसाठी एक दिलासाडेंक बातमी समोर आली आहे. मान्सून अंदमानात दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांसाठी खुशखबर आहे.
अंदमान निकोबार बेटांवर गेल्या २४ तासांमध्ये जोरदार पाऊस झाल्याचे समोर येत आहे. बंगालचा उपसागर उत्तर अंदमानचा समुद्र, निकोबर बेट या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये अरबी समुद्राचा काही भाग, मालदिव दक्षिण बंगालचा उपसगरचा काही भाग मान्सून दाखल होण्यास चांगला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार?
राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज पुणे आणि अन्य शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान महाराष्ट्रासाठी देखील एक आनंदाची बातमी समोर येत आहे. यंदा मान्सून महाराष्ट्रात लवकरच येण्याची शक्यता आहे. ६ जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे. २७ मे दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये 14 हजार शेतकऱ्यांचे नुकसान
विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने थैमान घातले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना, अवकाळीमुळे बळी गेल्याचीही घटना सोमवारी घडली. सोमवारी लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात वीज कोसळण्याच्या घटना घडली. या दोन्ही घटनांमध्ये नऊ जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे.
राज्यात अवकाळी पावसाचे थैमान; ऐन उन्हाळ्यात ओढ्यांना पूर तर नाशिकमध्ये 14 हजार शेतकऱ्यांचे नुकसान
इंदूर-पुणे मार्गावरील वाहतूक खोळंबली
मनमाड शहर व परिसरात विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे इंदूर-पुणे महामार्गावरील मनमाड बसस्थानकाच्या परिसरात विद्युत तारा व एक झाड पडल्याने या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान, पुणे, नाशिक, जालना जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात ओढ्यांना पूर आल्याचे चित्र दिसून आले.
येडशी, येरमाळा भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस
लातूर जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील येणेगूर परिसरात सोमवारी आठवडी बाजारादिवशी विद्युत खांबावर वीज पडल्याने वीज वाहक तार तुटून आठवडी बाजारात आलेल्यावर पडले. त्या तिघे जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यामध्ये दुपारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील येडशी, येरमाळा, भूम आणि धाराशिव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह अवकाळी झाला.