Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रतीक्षा संपली ! अखेर मान्सून आज केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी होणार आगमन ?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळच्या अनेक भागांमध्ये आज सकाळपासून पाऊस पडत आहे.

  • By साधना
Updated On: Jun 08, 2023 | 01:52 PM
monsoon in kerala

monsoon in kerala

Follow Us
Follow Us:

मान्सूनची (Monsoon Update) आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सूनची प्रतीक्षा आता संपली आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सून केरळमध्ये (Monsoon In Kerala) दाखल झाल्याची माहिती दिली आहे. जवळपास एक आठवडा उशीराने का होईना पण मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे देशभरातील जनतेसोबतच शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. (Weather Update)

[read_also content=”ऑफिस आहे की कोंडवाडा? ‘या’ कंपनीत चक्क कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये कोंडून वॉचमनने बाहेरून लावलं टाळं,पाहा Video https://www.navarashtra.com/viral/company-locked-office-while-employee-present-in-the-office-viral-video-nrsr-412749.html”]

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, “नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळच्या अनेक भागांमध्ये आज सकाळपासून पाऊस पडत आहे. दरवर्षी मान्सून 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होत असतो. पण यावर्षी मान्सूनचं आगमन होण्यासाठी  एक आठवड्याचा कालावधी लागला. मान्सूनने केरळमध्ये दाखल होण्यासाठी 8 जूनची तारीख गाठली. आता कालांतराने मान्सून पुढे सरकत जाईल आणि सक्रीय होईल.

Monsoon reaches Indian mainland, IMD declares onset over Kerala — Press Trust of India (@PTI_News) June 8, 2023

मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला असून तो लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल. मान्सून तळकोकणात 16 जून किंवा त्यानंतरच दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मान्सूनच्या आगमनामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आता मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची सगळेजण वाट बघतायत.

दरम्यान, यावर्षी बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनवर खूप परिणाम झाला. या चक्रीवादळाच्या परिणामामुळेच मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी उशीर होत असल्याचं हवामान खात्याने सांगितलं होतं. आता मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.

 तीन आठवड्यांत निर्माण होणारे दुसरे चक्रीवादळ
उत्तर हिंदी महासागरात तीन आठवड्यांत निर्माण होणारे बिपरजॉय हे दुसरे चक्रीवादळ असेल. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोचा चक्रीवादळाने बांगलादेश आणि म्यानमारमध्ये प्रचंड नुकसान झाले होते.

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
अरबी समुद्रात खोलवर बिपरजॉय चक्रीवादळ तयार होत असल्याने कोकण किनारपट्टीवर याचा फारसा परिणाम होणार नाही. तसंच, चक्रीवादळामुळे येणाऱ्या पावसाचीही शक्यता नाही. मात्र, मच्छिमार बांधवांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांना मच्छीमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन हवामान खात्याने केले आहे. तसंच, “8, 9, 10 जून रोजी कर्नाटकात गोवा-महाराष्ट्राचा किनारपट्टीच्या भागात वादळी वाऱ्याचा वेग 40-50 KMPH असण्याची शक्यता आहे. या काळात नैऋत्य अरबी समुद्र, कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे, त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये”, असं ट्वीट पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी केलं आहे.

Web Title: Monsoon reached at kerala today nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2023 | 01:43 PM

Topics:  

  • Monsoon In Kerala
  • Weather forecast
  • Weather Update

संबंधित बातम्या

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता
1

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
2

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…
3

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
4

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.