Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुनेच्या नावावर असणाऱ्या घरात सासूला राहण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

घराच्या मालकीपेक्षा त्या घरातील सामायिक वास्तव्यास आणि कौटुंबिक नातेसंबंधांना अधिक महत्त्व आहे. त्यामुळे केवळ मालकी हक्काचा आधार घेत सासूला घराबाहेर काढणे कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरता येणार नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 06, 2026 | 09:43 AM
धर्मांतरविरोधी कायद्याचा लागू होण्याआधीच वापर; पुणे पोलिसांची गफलत उघड

धर्मांतरविरोधी कायद्याचा लागू होण्याआधीच वापर; पुणे पोलिसांची गफलत उघड

Follow Us
Follow Us:

सिमला : घराची मालकी सुनेच्या नावावर असली तरी सासूला त्या घरात राहण्याचा कायदेशीर अधिकार नाकारता येत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने दिला. केवळ मालकी हक्काच्या आधारावर सासूला घराबाहेर काढू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती राकेश कैथला यांनी सुरभी बेदी विरुद्ध मनजीत कौर या प्रकरणात सूनेची याचिका फेटाळून लावत मंडी जिल्हा न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवला.

न्यायालयाने स्पष्ट केले की, घर कोणाच्या नावावर आहे, यापेक्षा शेअर्ड हाऊसहोल्ड हा अधिकार अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे घर पती, सासू किंवा बहू यांच्या नावावर नसले तरी, कौटुंबिक नातेसंबंध असल्यास संबंधित व्यक्तीला त्या घरात राहण्याचा अधिकार मिळू शकतो.

काय आहे नेमकं प्रकरण?

मंडी जिल्ह्यातील रामनगर येथील एका महिलेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिच्या मुलाचा विवाह २०१३ मध्ये झाला आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंब एकाच घरात राहत होते. २०२५ मध्ये कौटुंबिक वाद निर्माण झाल्यानंतर सुनेने संबंधित घर तिच्या स्वतःच्या कमाईतून बांधल्याचा दावा केला. घरावर केवळ तिचाच अधिकार असल्याचे सांगत तिने ते भाड्याने दिले आणि सासूला घराबाहेर जाण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर सासूने घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत न्यायालयात धाव घेत संरक्षण, सुरक्षा आणि निवासाचा अधिकार मागितला.

न्यायालयाने काय म्हटले?

सुनेने घराची एकमेव मालकीण असल्याचा दावा केला असला, तरी न्यायालयाने दोघींमध्ये पूर्वीपासून कौटुंबिक सहवास असल्याचे लक्षात घेतले. न्यायालयाने नमूद केले की, सासू-सून एकाच घरात राहत आहे. त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीला भाडेकरू ठेवून सासूला अप्रत्यक्षपणे घराबाहेर काढणे कायद्याच्या विरोधात आहे.

निकाल ठरू शकतो महत्त्वाचा संदर्भ

उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले की, घराच्या मालकीपेक्षा त्या घरातील सामायिक वास्तव्यास आणि कौटुंबिक नातेसंबंधांना अधिक महत्त्व आहे. त्यामुळे केवळ मालकी हक्काचा आधार घेत सासूला घराबाहेर काढणे कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरता येणार नाही. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचा हा निर्णय घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत राहण्याच्या अधिकाराबाबत महत्त्वाचा मानला जात असून, अशा प्रकारच्या प्रकरणांसाठी तो महत्त्वाचा संदर्भ ठरू शकतो.

Supreme Court News : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचे सूचक विधान; हिंसेने नव्हे संवादाने

Web Title: Mother in law right to reside in a house registered in the daughter in laws name

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • Court Decision
  • Haryana News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.