
MP Rahul Gandhi push up Punishment for coming late in program in MP
मध्य प्रदेशातील पंचमढीमध्ये आयोजित काँग्रेस जिल्हा अध्यक्षांच्या प्रशिक्षण सत्रादरम्यान उशीर करणाऱ्यांना अनोखी शिक्षा देण्याचा पायंडा पाडला होता. उशिरा येणाऱ्याचे स्वागत टाळ्या वाजून त्यांना ‘टाईम मॅनेजमेंट’ महत्व कळावे आणि प्रतिकात्मक शिक्षाही दिली जात होती. याच ठिकाणी राहुल गांधी स्वतःच २० मिनिटे उशिरा पोहचले. त्यामुळे स्वतः राहुल गांधी यांना दहा पुशअप्सची शिक्षा झाली. जी राहुल गांधी त्यांनी हसत स्वीकारली. सोशल मीडिया राहुल गांधी यांचा पुश अप करतााना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही शिक्षा स्वीकारल्यामुळे राहुल गांधी यांचे कॉग्रेस नेत्यांकडून कौतुक केले जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वृत्तसंस्थेशी बोलताना मध्य प्रदेश काँग्रेसचे मीडिया समन्वयक अभिनव बरोलिया म्हणाले, “आमचे नेते राहुलजी यांच्यासाठी हे काही नवीन किंवा आश्चर्यकारक नाही. आमच्या गटात आम्ही शिस्तीचे काटेकोरपणे पालन करतो. पक्षात लोकशाही आहे जिथे सर्वांना समान आणि समान वागणूक दिली जाते. आमच्या पक्षात भाजपसारखा ‘बॉसिझम’ (बॉसगिरी) नाही.” अशी भूमिका कॉंग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे.
प्रत्येक आठ मतदारांपैकी एकाचं मत चोरलं
राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशमध्ये भाषण करताना भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी भाजपकडून कायमच मतचोरी केली जात असल्याचा आरोप केला. राहुल गांधी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी हरियाणा मॉडेल सादर केले होते. २५ लाख मतांची चोरी झाल्याचं दाखवून दिलं. प्रत्येक आठ मतदारांपैकी एकाचं मत चोरलं होते. ही यांची व्यवस्था आहे. मुख्य मुद्दा ‘व्होट चोरी’ आहे. आमच्याजवळ पुरावे आहेत आणि आम्ही एक- एक करुन जाहीर करणार आहोत, असा आक्रमक पवित्रा राहुल गांधींनी घेतला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर साधला निशाणा
तथापि, मध्य प्रदेशात भाजपकडूनही राहुल गांधींवर हल्ला होत आहे. शनिवारी राहुल गांधींनी जंगल सफारीचा आनंद घेतला हे लक्षात घ्यावे. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, राहुल गांधी राजकारण गांभीर्याने घेत नाहीत. ते म्हणाले की, बिहारसारख्या राज्यात निवडणुका होत असताना, ते मध्य प्रदेशात जंगल सफारीचा आनंद घेत आहेत. यामुळे भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.