Union Minister Amit Shah's Maharashtra tour suddenly postponed, what is the exact reason, read in detail

एमएलजेके-एमए बंदी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुस्लिम लीग जम्मू आणि काश्मीर या राजकीय पक्षावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. बंदीनंतर जम्मू काश्मीरमध्ये मोठी घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीही केंद्र सरकारकडून याची खबरदारी घेण्यात आली आहे.

    एमएलजेके-एमएवर बंदी : केंद्र सरकारने बुधवारी (२७ डिसेंबर) मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर-मसरत आलम गटावर (एमएलजेके-एमए) बंदी घातली आहे. सरकारने ही कारवाई बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत केली आहे. संघटनेचे सदस्य जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते आणि दहशतवादी गटांना पाठिंबा देत असल्याचा आरोप या संघटनेवर आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

    दहशतवादी कारवायांना समर्थन असल्याचा ठपका

    त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले ‘ही संघटना आणि तिचे सदस्य जम्मू आणि काश्मीरमध्ये देशविरोधी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये गुंतलेले आहेत. दहशतवादी कारवायांचे समर्थन करतात आणि लोकांना जम्मू आणि काश्मीरमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करतात.’

    देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना सोडले जाणार नाही

    गृहमंत्री पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा संदेश मोठा आणि स्पष्ट आहे की, आपल्या देशाची एकता, सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या विरोधात काम करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही आणि कायद्याच्या रोषाला सामोरे जावे लागेल.