Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“माझ्या आईचं अपहरण झालेय, तिचा लैंगिक छळ केलाय”; खुद्द मुलानेच केले गंभीर आरोप; प्रज्ज्वल रेवण्णा सेक्स टेप प्रकरण

HD Revanna : "प्रज्जव रेवण्णा प्रकरणाने देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. आता तर एका पीडितेच्या मुलानेच गुन्हा नोंद केला आहे. त्याने म्हटलंय की,  1 मे रोजी मला मित्रांकडून समजलं की, माझ्या आईचे लैंगिक छळाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत" त्यानंतर राजूने पोलिसात आईच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. प्रज्ज्वल रेवन्नाच्या कथित सेक्स टेपमध्ये ज्या पीडित महिला दिसल्या, त्यात राजू एचडीची आई होती.

  • By युवराज भगत
Updated On: May 04, 2024 | 02:24 PM
My mother was kidnapped, sexually assaulted"; The boy himself made serious allegations, the Prajjwal Revanna sex tape case

My mother was kidnapped, sexually assaulted"; The boy himself made serious allegations, the Prajjwal Revanna sex tape case

Follow Us
Close
Follow Us:

Prajjwal Revanna Case : कर्नाटकातील सेक्स टेप प्रकरणाने देशाला हादरवून सोडले आहे. यात माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप आहेत. आरोपींवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण, बलात्कार केल्याचे गंभीर आरोप आहेत. कर्नाटकचे माजी मंत्री एच.डी. रेवण्णा यांच्याविरोधात अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. जेडीएस आमदार एच.डी. रेवण्णाच्या सहकाऱ्यांनी माझ्या आईच अपहरण केलंय, असा आरोप 20 वर्षांच्या राजू एचडीने केला आहे. रेवण्णा यांच्या फार्म हाऊसवर राजू एचडी आणि त्याची आई काम करायची. एच.डी. एच.डी. रेवण्णा यांचा मुलगा प्रज्ज्वल एच.डी. रेवण्णाच्या कथित सेक्स टेपमध्ये ज्या पीडित महिला दिसल्या, त्यात राजू एचडीची आई होती.

रेवन्ना आणि सतीश बाबान्ना विरोधात अपहरणाचा गुन्हा

भारतीय दंड विधान संहितेच्या विविध कलमातंर्गत पोलिसांनी रेवन्ना आणि सतीश बाबान्ना विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. एच.डी. रेवन्नाने अटकपूर्व जामिनाची मागणी केली आहे. त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या एका दुसऱ्या महिलेच्या तक्रारीवरुन रेवन्ना आणि त्याच्या मुलाविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल झाली आहे. म्हैसूर जिल्ह्यातील केआर नगर पोलीस ठाण्यात 2 मे रोजी राजू एचडीने तक्रार नोंदवली. “29 एप्रिलपासून माझी आई बेपत्ता आहे. तिच्या लैंगिक छळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत” असा आरोप राजू एचडीने केलाय.

‘सतीशने 26 एप्रिलला आईला घरी आणून सोडलं’
“मी आणि माझ्या आईने सहावर्ष रेवन्नाच्या घरी आणि फार्म हाऊसवर काम केलं. आईने तिने वर्षापूर्वी तिथे काम करणं बंद केलं” असं राजूने तक्रारीत म्हटलय. “26 एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झालं. त्याच्या तीन-चार दिवस आधी सतीश नावाचा इसम आमच्या घरी आला. रेवन्नाची पत्नी भवानीने काही कामानिमित्त घरी बोलवल्याच त्याने आईला सांगितलं” असं राजू म्हणाला. “सतीशने 26 एप्रिलला आईला घरी आणून सोडलं. पोलीस घरी येऊ शकतात, म्हणून त्याने मला आणि आईला काही दिवसांसाठी गायब व्हायला सांगितलं” असं राजू म्हणाला.

रेवण्णाच्या घरी आणि फार्म हाऊसवर काम
“मी आणि माझ्या आईने सहावर्ष रेवन्नाच्या घरी आणि फार्म हाऊसवर काम केलं. आईने तिने वर्षापूर्वी तिथे काम करणं बंद केलं” असं राजूने तक्रारीत म्हटलय. “26 एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झालं. त्याच्या तीन-चार दिवस आधी सतीश नावाचा इसम आमच्या घरी आला. रेवन्नाची पत्नी भवानीने काही कामानिमित्त घरी बोलवल्याच त्याने आईला सांगितलं” असं राजू म्हणाला. “सतीशने 26 एप्रिलला आईला घरी आणून सोडलं. पोलीस घरी येऊ शकतात, म्हणून त्याने मला आणि आईला काही दिवसांसाठी गायब व्हायला सांगितलं” असं राजू म्हणाला.

‘मित्रांकडून समजलं आईचे लैंगिक छळाचे व्हिडिओ व्हायरल’
तीन दिवसानंतर 29 एप्रिलला रात्री 9 च्या सुमारास सतीश पुन्हा आला. तो जबरदस्ती आईला सोबत घेऊन गेला. रेवन्नाचा आदेश असल्याच त्याने सांगितलं. “पोलिसांनी आईला पकडलं, तर गुन्हा दाखल होईल, आम्ही सगळे तुरुंगात जाऊ” असं सतीशने सांगितल्याच राजूने तक्रारीत म्हटलं आहे. “1 मे रोजी मला मित्रांकडून समजलं की, माझ्या आईचे लैंगिक छळाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत” त्यानंतर राजूने पोलिसात आईच्या अपहरणाची तक्रार नोंदवली.

Web Title: My mother was kidnapped sexually assaulted the boy himself made serious allegations prajjwal revanna sex tape case nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2024 | 02:24 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.