Narendra Modi broke Indira Gandhi's record of the tenure of India as Prime Minister of India
PM Narendra Modi Record : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. फक्त देशामध्ये नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदी हे जनतेमध्ये आश्वासक चेहरा म्हणून पुढे येत आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे मोदी यांची भारताचे पंतप्रधान म्हणून तिसरी टर्म सुरु झाली आहे. मागील एक दशकापासून नरेंद्र मोदी हे भारताचे नेतृत्व करत आहेत. याबाबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांचा महत्त्वपूर्ण विक्रम आज मोडला आहे. ते 25 जुलैपर्यंत प्रदीर्घ काळ हे पद धारण करणारे देशातील दुसरे पंतप्रधान झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विक्रम मागे सोडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या गैर हिंदी भाषेच्या राज्यात जन्मलेले प्रदीर्घ काळासाठी हे पंतप्रधान पद धारण करणारे पहिले पंतप्रधान झाले आहेत. पंतप्रधान म्हणून नरेंद्र यांनी आणखी अनेक विशेष विक्रम तयार केले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भारताचे पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरू यांनी आतापर्यंत प्रदीर्घ कालावधी म्हणून कार्यभार पाहिला आहे. पंडित नेहरु यांनी 16 वर्षे 286 दिवस भारताचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले असून ते या रेकॉर्डसह पहिल्या क्रमांकावर आहेत. यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977 या कालावधीत सलग 4077 दिवस पंतप्रधान म्हणून काम केले. मात्र आता नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांचा हा रेकॉर्ड मोडला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्य व केंद्र या दोन्ही स्तरांवर सरकारचे नेतृत्व करण्याविषयी बोललो तर नरेंद्र मोदींनीही सर्व पंतप्रधानांमध्ये विशेष विक्रम नोंदविला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी एकूण 24 वर्षे राज्याचे आणि देशाचे नेतृत्व केले आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान आहेत. प्रदीर्घ काळ काम करणारे ते पहिले पंतप्रधान आहेत. याव्यतिरिक्त, ते पहिले आणि एकमेव देशाचे पंतप्रधान आहेत ज्यांनी आपला दोन वेळा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. सलग दोनदा निवडले जाणारे पहिले आणि नॉन-कॉंग्रेस पंतप्रधान म्हणून त्याचे नाव देखील नोंदवले गेले आहे. असे देशाच्या पंतप्रधान पदाबाबत नरेंद्र मोदी यांनी अनेक विक्रम नोंदवले आहेत.
पूर्ण बहुमत मिळविणारे पहिले गैर-कॉंग्रेस पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळविणारा पहिले आणि एकमेव नेता आहे. इंदिरा गांधी (1971) नंतर संपूर्ण बहुमताने पुन्हा निवडून आलेले ते पहिले पंतप्रधान आहेत. पंडित नेहरू व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी पक्षाचा नेता म्हणून सलग तीन सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या आहेत. देशातील सर्व पंतप्रधान आणि मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी हे एकमेव नेते आहेत ज्यांनी पक्षाचा नेता म्हणून सलग सहा निवडणुका जिंकल्या आहेत. यामध्ये 2002, 2007 आणि 2012 च्या गुजरात विधानसभा निवडणूका तर 2014, 2019 आणि 2024 या लोकसभा निवडणुकींचा समावेश आहे.