सुनीता विल्यम्स यांचा भारातातील कोणत्या राज्याशी आहे संबंध? भगवत गीता का घेऊन गेल्या अंतराळात? वाचा सविस्तर
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) नऊ महिन्यांहून अधिक काळ घालवल्यानंतर, भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सरकारी बुच विल्मोर यांनी अखेर पृथ्वीकडे कूच केली आहे. जून २०२४ मध्ये सुनीता आणि बुच एका आठवड्याच्या अंतराळ मोहिमेसाठी गेल्या होत्या. मात्र त्यांच्या बोईंग स्टारलाइनर अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्या अंतराळ स्थानकातच अडकून पडल्या होत्या. दरम्यान आकाशाकडे नजर लावून असलेल्या करोडो भारतीयांशी त्यांचा काय संबंध आहे? जाणून घेऊया अरविंदा अनंतरामन यांनी ‘सुनिता विल्यम्स:अ स्टार इन अ स्पेस’ या पुस्तकातून त्यांचा भारावून टाकणारा प्रवास मांडला आहे.
सुनिता विल्यम्स यांचे वडील दीपक पांड्या मूळचे गुजरातच्या अहमदाबादमधल्या मेहसाना जिल्ह्यातील झुलासन गावचे रहिवाशी होते. डॉक्टर असलेले दीपक पांड्या यांनी त्यांचं वैद्यकीय शिक्षण अहमदाबादमध्ये पूर्ण केलं. दीपक यांचे भाऊ नवीन अमेरिकेत होते. त्यांच्यासोबत नंतर दीपकही त्याठिकाणी गेले. दोन वर्ष त्याठिकाणी वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावल्यानंतर पुन्हा भारतात यायचं असं ठरवून दीपक पांड्या अमेरिकेत गेले. पण तसं झालं नाही.
अमेरिकेत गेल्यानंतर दीपक पांड्या यांची बोनी झोलोकर यांच्याशी मैत्री झाली. पुढं या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्नं केलं. त्यानंतर दीपक पांड्या अमेरिकेतच स्थायिक झाले. दीपक आणि बोनी यांना जय, दिना आणि सुनिता अशी तीन मुलं झाली. 19 सप्टेंबर 1965 रोजी अमेरिकेच्या ओहियोमध्ये सुनिता यांचा जन्म झाला. सुनिता सर्वांमध्ये लहान होत्या. दीपक हिंदू आणि आई कॅथलिक असल्यानं घरात संमिश्र वातावरण आणि सर्व धर्मांप्रती आदर करण्याची शिकवण त्यांना लहानपणापासूनचं मिळाली.
दीपक रविवारी चर्चमध्ये जायचे आणि जाताना भगवद् गीता सोबत घेऊन जायचे. मुलांना रामायण, महाभारतातील कथा ऐकव असत. त्यांनी भारतीय संस्कृतीशी नाळ ठेवली, असं पुस्तकात म्हटलं आहे. सुनिता यांच्या घरात सर्वच विषयांवर मोकळेपणानं चर्चा होत असतं. पण मुलांच्या फिटनेसवर पांड्या दाम्पत्याचं विशेष लक्ष्य होतं. त्यातूनच त्यांनी तिन्ही मुलांना पोहण्याच्या सरावाची चांगली सवय लावली.
सुनिता अंतराळात जाताना सोबत समोसा आणि भगवत गीता घेऊन गेल्या होत्या, त्याचीही खूप चर्चा झाली होती. त्याबाबत बोलताना सुनिता म्हणाल्या होत्या की, “मी सोबत समोसा आणि भगवत गीता नेण्याचं कारण म्हणजे,त्या गोष्टी माझ्यासाठी खास होत्या. माझ्या वडिलांना मला दिलेली ती भेट होती. मीही इतरांसारखीच आहे, हे त्या माध्यमातून दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो,” असं सुनिता म्हणाल्या होत्या.