Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोंगरगणची शाळा आता थेट चंद्रावर! NASA च्या मोहिमेत ३९ विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक सहभाग; ‘असं’ मिळणार बोर्डिंग पास

नासाच्या आर्टेमिस २ मोहिमेत अहिल्यानगरमधील डोंगरगण जिल्हा परिषद शाळेचा सहभाग! ३९ विद्यार्थी आणि २ शिक्षकांची नावे एसडी कार्डद्वारे चंद्रावर पाठवली जाणार असून नासाने त्यांना बोर्डिंग पासही दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 06, 2026 | 06:18 PM
डोंगरगणची शाळा आता थेट चंद्रावर! NASA च्या मोहिमेत ३९ विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक सहभाग (Photo Credit- X)

डोंगरगणची शाळा आता थेट चंद्रावर! NASA च्या मोहिमेत ३९ विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक सहभाग (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • सातासमुद्रापार नव्हे, तर अवकाशात!
  • नासाच्या मोहिमेत डोंगरगण शाळेचा सहभाग
  • ‘एसडी कार्ड’द्वारे विद्यार्थी पोहचणार चंद्रावर
Dongargan School NASA: अहिल्यानगर, शहर वार्ताहर नगर तालुक्यातील डोंगरगण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ३९ विद्यार्थी व दोन शिक्षकांची नावे थेट चंद्रावर पाठवली जाणार आहेत. नासा या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेच्या आर्टेमिस २ मोहिमेत त्यांचा ऐतिहासिक सहभाग नोंदवला जाणार आहे. या विद्यार्थ्यांच्या नावांचे बोर्डिंग पास नासाकडून देण्यात आले आहे. हा क्षण शाळेसाठी अभिमानास्पद ठरत आहे. या मोहिमेत व्हर्चुअल गेस्ट म्हणून सहभागी होण्याबाबत नासाने आवाहन केले होते. या उपक्रमात नासाकडून केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून डोंगरगण शाळेने नोंदणी केली होती. यशस्वीरित्या विद्याथ्यांची नोंदणी झाल्यानंतर नासाकडून विद्यार्थी आणि शिक्षकांचे बोर्डिंग पास पाठवण्यात आले. या बोर्डिंग पासचे वितरण आज शाळेत विद्यार्थ्यांना करण्यात आले. त्यांना मोहिमेचे प्रक्षेपण ही व्हच्युअली पाहता येणार आहे. या विद्यार्थ्यांची नावे एका एसडी कार्ड मध्ये संग्रहित करून ओरियन यानाद्वारे चंद्राकडे पाठवली जाणार आहेत.

शाळेचा ‘बोर्डिंगपास’ मिळाला विद्यार्थ्यांच्या हाती

या उपक्रमामागे शाळेतील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम यांची कल्पकता आणि विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठीची धडपड दिसून येते. विद्यार्थ्यांना या बाल वयात अंतराळ मोहीम, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक, अंतराळवीर यांची माहिती व्हावी त्यांच्या डोळ्यात स्वप्ने पेरली जावीत म्हणून आम्ही हा उपक्रम आयोजित केला होता असे बोर्डिंग पास वितरण वेळी मंगलारम म्हणाले, तर आर्टेमिस मोहिमेची समग्र माहिती, अंतराळात गुरुत्वाकर्षण विरहित वातावरणात अंतराळवीर कसे राहतात, कसे खातात, झोपतात, हे सर्व विद्यार्थ्यांना माहित व्हावे म्हणून आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती दिली.

जि. प. शाळेच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था! अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; शिक्षणाऐवजी गैरसोयींचाच सामना

या मुलांचा स्पर्धेत सहभाग

निखिल कदम, युवा गायकवाड, आरूष चांदणे, प्रिया कदम, काव्या चांदणे, शंभू चांदणे, सार्थक गायकवाड, ममता दळे, रुचिता कदम, प्रशांत चांदणे, सोहम कदम, श्रेयस शिरसाठ, देव ठोंबे, मयूर आहेर, श्रवणी चांदणे, आरोही चांदणे, श्रावणी भांदळ, आयुष चांदणे, अनुष्का हिलगुडे, श्रुती भांबळ, अक्षद शिरसाठ, जय शिरसाठ, रुद्र ठोंबे, समर्थ चादणे, समर्थ कदम, शुभम दळे, कृष्णा बर्डे व नारायण मंगलारम आणि ज्ञानेश्वर चेडे यांचा समावेश आहे.

अंतराळवीर पलीकडील मिळणार माहिती

आर्टमिस-२’ ही मोहीम एप्रिल २०२६ पूर्वी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित होईल. अंतराळवीर चंद्राच्या पलीकडे ६ लाख ८५ हजार मैल प्रवास करून पॅसिफिक महासागरात परतणार आहेत. याची माहिती जगभरातील सर्वसामान्य जनतेला व्हावी साठी नासाने हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमाबद्दल शिक्षणधिकारी भास्कर पाटील व नगरच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, विस्तार अधिकारी संजय बोबडे, केंद्राप्रमुख बाबागोसावी डोंगरगण शाळेतील विद्याथ्यांचे कौतक केले आहे.

तरूणांचे Police होण्याचे स्वप्न पूर्ण होणार! ‘या’ राज्यात परीक्षेच्या तारखा जाहीर; कॉन्स्टेबल अन्…

Web Title: Ahilyanagar dongargan zp school students names to moon nasa artemis 2 mission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Career News
  • NASA

संबंधित बातम्या

जि. प. शाळेच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था! अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; शिक्षणाऐवजी गैरसोयींचाच सामना
1

जि. प. शाळेच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था! अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; शिक्षणाऐवजी गैरसोयींचाच सामना

UPSC CSE 2026 Notification: यूपीएससीच्या ९३३ जागांसाठी भरती जाहीर; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत
2

UPSC CSE 2026 Notification: यूपीएससीच्या ९३३ जागांसाठी भरती जाहीर; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत

तरूणांचे Police होण्याचे स्वप्न पूर्ण होणार! ‘या’ राज्यात परीक्षेच्या तारखा जाहीर; कॉन्स्टेबल अन्…
3

तरूणांचे Police होण्याचे स्वप्न पूर्ण होणार! ‘या’ राज्यात परीक्षेच्या तारखा जाहीर; कॉन्स्टेबल अन्…

UPSC च्या नियमांत मोठा बदल! आता सेवेत असताना वारंवार देता येणार नाही परीक्षा; जाणून घ्या नवीन नियम
4

UPSC च्या नियमांत मोठा बदल! आता सेवेत असताना वारंवार देता येणार नाही परीक्षा; जाणून घ्या नवीन नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.