Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solar Storm: सूर्यावर महाभयंकर स्फोट! ‘Aditya-L1’चा इस्रोच्या 50 उपग्रहांना रेड अलर्ट; जगभरात ‘रेडिओ ब्लॅकआऊट’चा धोका

Solar Storm: NASA ते ISRO पर्यंत, जगभरातील अंतराळ संस्था सध्या सूर्याच्या आत खोलवर घडणाऱ्या एका घटनेवर लक्ष ठेवून आहेत. सूर्य सतत शक्तिशाली सौर ज्वाला सोडत आहे जे थेट पृथ्वीवर आदळत आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 07, 2026 | 06:30 PM
powerful solar flare hits earth isro nasa alert radio blackout risk february 2026

powerful solar flare hits earth isro nasa alert radio blackout risk february 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • सूर्याचा रौद्रावतार
  • इस्रो आणि नासा हाय-अलर्टवर
  • विज्ञानासाठी मोठे आव्हान

Powerful Solar Flare Hits Earth February 2026 : आपल्या सूर्यमालेचा आधारस्तंभ असलेला ‘सूर्य’ सध्या कमालीचा अस्वस्थ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सूर्याच्या अंतर्भागात असे काही स्फोट होत आहेत, ज्याने अंतराळ संशोधकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. १ फेब्रुवारी २०२६ पासून सूर्यामधून सतत शक्तिशाली ‘सौर ज्वाला’ (Solar Flares) बाहेर पडत असून त्या थेट पृथ्वीच्या दिशेने झेपावत आहेत. अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ (NASA) आणि भारतीय अंतराळ संस्था ‘इस्रो’ (ISRO) यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली असून हाय-अलर्ट जारी केला आहे.

नेमकं काय घडलंय सूर्यामध्ये?

सूर्याच्या पृष्ठभागावर ‘ऍक्टिव्ह रिजन १४३६६’ (Active Region 14366) नावाचा एक अत्यंत अस्थिर आणि मोठा सनस्पॉट तयार झाला आहे. या भागात चुंबकीय ऊर्जेचा प्रचंड साठा झाल्याने तिथे मोठे स्फोट होत आहेत. नासाच्या ‘सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरी’ने (SDO) दिलेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:१३ वाजता (ET) एक शक्तिशाली सौर ज्वाला शिखरावर पोहोचली. ही ऑक्टोबर २०२४ नंतरची सर्वात तेजस्वी आणि १९९६ नंतरच्या २० सर्वात मोठ्या सौर ज्वालांपैकी एक आहे.

हे देखील वाचा : Modi-Trump: रातोरात गेम पलटला! ट्रम्पकडून 500 अब्ज डॉलर्सच्या कराराचे ‘रिटर्न गिफ्ट’; अमेरिकेच्या नकाशात PoK भारताचा भाग

पृथ्वीवर काय होणार परिणाम? (Radio Blackout Risk)

या सौर ज्वाला जेव्हा पृथ्वीच्या वातावरणाशी, विशेषतः ‘आयनोस्फीयर’शी (Ionosphere) टकरातात, तेव्हा त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा मारा करतात.

  • रेडिओ ब्लॅकआऊट: हाय-फ्रिक्वेन्सी रेडिओ लहरी विस्कळीत झाल्यामुळे विमान वाहतूक आणि सागरी दळणवळणात अडथळे येऊ शकतात.
  • जीपीएस आणि उपग्रह: उपग्रहांच्या संवेदनशील इलेक्ट्रॉनिक्सवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे नेव्हिगेशन आणि टीव्ही सिग्नलमध्ये बिघाड होऊ शकतो.
  • पॉवर ग्रीड: अत्यंत तीव्र सौर वादळ असल्यास पृथ्वीवरील वीजपुरवठा खंडित होण्याची (Power Grid Failure) भीती असते.
The sun just put on a superheated fireworks display. It unleashed 4 powerful solar flares between Feb 1 and 2, including 1 of the strongest sunburst in 3 decades, causing blackouts and increasing aurora activity over the next few days. All 4 clocked in with an X-class ranking,… pic.twitter.com/bBCuOHnfWL — Robbie Mouton (@mcgmouton57) February 3, 2026

credit – social media and Twitter

इस्रोची ‘अग्निपरीक्षा’ आणि आदित्य-L1 ची भूमिका

भारताची अंतराळ संस्था ‘इस्रो’ सध्या ५० हून अधिक सक्रिय उपग्रहांचे रक्षण करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. इस्रोचे शास्त्रज्ञ उपग्रहांच्या कक्षेवर आणि त्यांच्या उपकरणांवर सतत देखरेख ठेवत आहेत. विशेष म्हणजे, भारताचे ‘आदित्य-L1’ (Aditya-L1) हे अंतराळयान सध्या सूर्याचा अभ्यास करत असून, या सौर वादळांची पूर्वसूचना देण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावत आहे. “आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि उपग्रहांना कोणताही धोका पोहोचू नये यासाठी खबरदारी घेत आहोत,” असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा : Nuclear Shift: बटण दाबले की विनाश! भारत शांततेच्या काळातही क्षेपणास्त्रे ठेवणार ‘रेडी टू फायर’; SIPRI अहवालाने पाकला फुटला घाम

मानवासाठी धोका आहे का?

सामान्य माणसासाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे, या सौर ज्वालांचा जमिनीवर राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत नाही. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आणि ओझोन थर या घातक किरणांना रोखून धरतात. मात्र, आपण ज्या तंत्रज्ञानावर (मोबाईल, इंटरनेट, जीपीएस) अवलंबून आहोत, ते काही काळासाठी ठप्प होऊ शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सौर ज्वाला (Solar Flare) म्हणजे नक्की काय?

    Ans: सूर्याच्या पृष्ठभागावर चुंबकीय ऊर्जेच्या अचानक सुटकेमुळे होणाऱ्या प्रचंड स्फोटाला सौर ज्वाला म्हणतात. यामुळे अंतराळात तीव्र किरणोत्सर्ग पसरतो.

  • Que: या सौर वादळामुळे भारतात इंटरनेट बंद होईल का?

    Ans: पूर्णपणे इंटरनेट बंद होण्याची शक्यता कमी आहे, मात्र हाय-फ्रिक्वेन्सी रेडिओ दळणवळण आणि उपग्रहावर आधारित सेवांमध्ये तात्पुरता व्यत्यय (Radio Blackout) येऊ शकतो.

  • Que: इस्रो या परिस्थितीचा सामना कसा करत आहे?

    Ans: इस्रो आपल्या ५० उपग्रहांवर सतत लक्ष ठेवून आहे आणि 'आदित्य-L1' मोहिमेद्वारे सौर हालचालींचा रिअल-टाइम डेटा मिळवून आवश्यक खबरदारी घेत आहे.

Web Title: Powerful solar flare hits earth isro nasa alert radio blackout risk february 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Aditya-L1 Mission
  • ISRO
  • NASA
  • solar storm

संबंधित बातम्या

डोंगरगणची शाळा आता थेट चंद्रावर! NASA च्या मोहिमेत ३९ विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक सहभाग; ‘असं’ मिळणार बोर्डिंग पास
1

डोंगरगणची शाळा आता थेट चंद्रावर! NASA च्या मोहिमेत ३९ विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक सहभाग; ‘असं’ मिळणार बोर्डिंग पास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.