अमित शहा राज्यसभेत आक्रमक (फोटो- ani)
१. राज्यसभेत अमित शाह आक्रमक
२. ऑपरेशन सिंदूरवरून शहा यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.
३. चर्चा होणार हे ठरले मात्र उत्तर कोण देणार हे सरकार ठरवते असे शाह म्हणाले.
Amit Shah/operation Sindoor: संसदेत आज देखील ऑपरेशन सिंदूरवर चर्चा पार पडली. अमित शाह यांनी राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर विरोधकांच्या मुद्द्यांना उत्तर दिले. यावेळी त्यांनी सभागृहात बोलणाऱ्या विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. गृहमंत्री अमित शाह राज्यसभेत बोलण्यासाठी उभे राहताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी अमित शाह नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.
राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर बोलण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उभे राहिले असताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदी यांनी सभागृहात येऊन उत्तर द्यावे अशी मागणी केली. यावेळी बोलताना अमित शाह विरोधकांना टोला हाणत म्हणाले, “तुम्ही आधी माझ्याशीच बोला, पंतप्रधानांना कशाला बोलावताय?”
Replying at the Rajya Sabha during Special Discussion on India’s powerful response to terrorism through 'Operation Sindoor'. https://t.co/UqdoEtNz2n
— Amit Shah (@AmitShah) July 30, 2025
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, “तुम्ही पंतप्रधानांना बोलावले तुम्हालाच त्रास होईल. तुम्ही अजूनही संतुष्ट नाही का, जे पंतप्रधानांना बोलवत आहात.” मात्र अमित शाह यांच्या बोलण्यानंतर देखील विरोधकांनी राज्यसभेत गोंधळ घालणे सुरूच ठेवले. त्यामुळे सभापती यांनी विरोधकांच्या वर्तणुकीवर नाराजी व्यक्त केली. तुम्ही दहशतवादी रोखण्यासाठी इतके वर्ष काही केले नाही, त्यामुळे तुम्हाला माझे बोलणे ऐकायचे नाहीये. दोन्ही सभागृहात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होईल हे बैठकीत ठरले होते. मात्र उत्तर कोण देणार हे सरकारद्वारे ठरवले जाते:”, असे अमित शाह म्हणाले.
जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका
राज्यसभेत बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा म्हणाले, “आपल्याला त्यांची (काँग्रेसच्या तत्कालीन सरकारची) तुष्टीकरणाची भावना समजून घेणे आवश्यक आहे. २००८ मध्ये इंडियन मुजाउद्दीनद्वारे जयपूरमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगले संबंध व्हावेत यासाठी प्रत्यन झाले. ते आमच्यावर ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही त्यांना बिर्याणी घालायला गेलो.”
पुढे बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा म्हणाले, “त्यांच्या सरकारच्या काळात आपल्याकडे लष्करी शक्ती होती. मात्र त्यांच्याकडे राजकीय इच्छाशक्ती नव्हती. २००९ मध्ये एससीओ शिखर संमेलनात २००८ च्या हल्ल्याचा साधा उल्लेख झाला नाही. तत्कालीन सरकारने २००५ च्या दिल्ली सिरीयल बॉम्बस्फोट, २००६ च्या वाराणसी दहशतवादी हल्ला, २००६ च्या मुंबई ट्रेनमधील बॉम्ब स्फोट याबाबत कोणतीही कारवाई केली नाही.”