Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court On UPI Fees: UPI कराचा वाद सर्वोच्च न्यायालयात; डिजिटल इंडियाला फटका अन् व्यापाऱ्यांवर बोजा

Supreme Court: ₹75,000 आणि त्यावरील रकमेच्या पेमेंटसाठी MDR प्रति व्यवहार कमाल ₹300 पर्यंत मर्यादित असेल. दूरसंचार, विमा आणि इंधन यांसारख्या अत्यावश्यक क्षेत्रांना प्रति व्यवहार ₹५ चा एक-वेळ एमडीआर भरावा लागेल.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 17, 2026 | 01:26 PM
UPI Charge Supreme Court, UPI Transaction Tax PIL,

UPI Charge Supreme Court, UPI Transaction Tax PIL,

Follow Us
Follow Us:
  • UPI वर ०.४% MDR शुल्क आकारण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
  • याचिकाकर्ते अंजन दत्ता यांच्याकडून केंद्र सरकारच्या अधिसूचनेविरोधात जनहित याचिका
  • मूलभूत हक्क व व्यापाराच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन होत असल्याचा याचिकेत दावा
Supreme Court On UPI Fees:  केंद्र सरकारने UPI वर शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातून या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. अशातच आता या शुल्क प्रकरणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. ₹२,००० पेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय पेमेंटवर ०.४% एमडीआर आकारणाऱ्या अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. अंजन दत्ता नावाच्या याचिकाकर्त्याने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून, कायद्यासमोर समानतेचा आणि व्यापाराच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की, हा निर्णय योग्य चर्चेविना लागू केला जात असून त्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्यात आलेले नाही. यामुळे लहान व्यापाऱ्यांवर बोजा पडेल. अतिरिक्त यूपीआय शुल्क टाळण्यासाठी, रोख पेमेंटची मागणी पुन्हा सुरू होऊ शकते. याचा परिणाम डिजिटल अर्थव्यवस्था राबवण्याच्या उद्दिष्टावर होईल.

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपासून व्यापाऱ्यांना केल्या जाणाऱ्या ₹२,००० पेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय पेमेंटवर ०.४% शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. व्यक्तींमधील व्यवहार आणि लहान रकमेच्या व्यवहारांना कोणत्याही शुल्कातून सूट देण्यात आली आहे. यूपीआय पेमेंटवर शुल्क आकारण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे देशातील राजकारण तापले आहे. काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्ष या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल करत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी UPI वरील कर मागे घ्यावा अशी मागणी केली आहे.

UPI पेमेंट संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे

₹2,000 पर्यंतच्या UPI व्यवहारांवर कोणताही MDR आकारला जाणार नाही.

₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या ग्राहक-ते-व्यापारी व्यवहारांवर 0.4 टक्के MDR लागू होईल.

₹3,000 च्या खरेदीवर, व्यापाऱ्याला 0.4 टक्के दराने डिपॉझिटिंग बँकेला ₹12 शुल्क द्यावे लागेल.

हे कमिशन बँकांसह संपूर्ण पेमेंट सिस्टमच्या भागीदारांमध्ये विभागले जाईल.

व्यक्ती-ते-व्यक्ती व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

सर्वसामान्यांना महागाईचा पुन्हा फटका; तांदळाच्या उत्पादनात मोठी घट, दरात 25 टक्क्यांनी वाढ

₹75,000 आणि त्यावरील रकमेच्या पेमेंटसाठी MDR प्रति व्यवहार कमाल ₹300 पर्यंत मर्यादित असेल. दूरसंचार, विमा आणि इंधन यांसारख्या अत्यावश्यक क्षेत्रांना प्रति व्यवहार ₹५ चा एक-वेळ एमडीआर भरावा लागेल.

म्युच्युअल फंड आणि स्टॉक ब्रोकर्सना केलेल्या पेमेंटवर ०.०२ टक्के एमडीआर लागू होईल, ज्याची कमाल मर्यादा ₹३०० असेल.

₹१ लाख पर्यंत मासिक उलाढाल असलेल्या लहान व्यापाऱ्यांना सर्व व्यवहारांवर अनिवार्य शून्य एमडीआर दिला जाईल.

यूपीआय ॲप प्रदात्यांना प्लॅटफॉर्म शुल्क किंवा कोणतेही छुपे शुल्क आकारण्यास मनाई असेल.

व्यापारी यूपीआय पेमेंटसाठी एमडीआर शुल्काचा बोजा ग्राहकांवर टाकत नाहीत याची खात्री करावी, असा सल्ला बँकांना देण्यात आला आहे.

व्यक्तींसाठी मोफत यूपीआय व्यवहारांवर कोणताही मासिक कोटा किंवा संख्येची मर्यादा असणार नाही.

 

 

Web Title: National newsupi transaction charge 0 4 percent challenged in supreme court pil filed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 01:26 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.