Vice President Election 2025 Result: 'एनडीए'चे वर्चस्व पुन्हा सिद्ध, सी.पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती
एनडीएकडून सीपी राधाकृष्णन होते उमेदवार
इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी होत उमेदवार
निवडणुकीत एनडीएचे पारडे राहिले जड
Indian Politics: जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आज झाली. विरोधी गटातील इंडिया आघाडी व सत्ताधारी एनडीएने सोमवारी जोरदार तयारी केल्याचे दिसून आले. सत्ताधारी एनडीएकडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन विरूद्ध इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी यांच्यात प्रमुख लढत पार पडली. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत एनडीएचा विजय नक्की असल्याचे म्हटले जात होते. अखेर सी.पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती झाले आहेत.
आज उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली. यामध्ये एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी हे उमेदवार होते. आजच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली. तर इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली.
आजच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण 768 खासदारांनी मतदान केले. लोकसभा व राज्यसभेतील मिळून एकूण खासदारांची संख्या 788 इतकी होते. दोन्ही सभागृहात 7 पदे रिक्त आहेत. म्हणजेच आज 781 खासदारांनी मतदान करणे अपेक्षित होते. त्यातील 13 खासदारांनी मतदान केले नाही. तर काही प्रमाणात इंडिया आघाडीचची मते फुटल्याचे देखील म्हटले जात आहे. 14 ते 15 खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचे म्हटले जात आहे.
अमित शहांनी दिल्या शुभेच्छा
देशाचे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
Congratulations to Shri C.P. Radhakrishnan Ji on being elected as the Vice President of India.
I firmly believe that your sagacity as a leader who has risen from the grassroots of the society and profound knowledge about administration will help us in bringing out the best in…
— Amit Shah (@AmitShah) September 9, 2025
तुमचा अनुभव आणि सखोल ज्ञान यामुळे तुम्ही लोकांची चांगल्या पद्धतीने सेवा करू शकाल असा मला ठाम विश्वास आहे.
उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय
उपराष्ट्रपतींच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाकडून बदल करण्यात आला आहे. गृह मंत्रालयाकडूने विविध सुरक्षा यंत्रणांशी संयुक्त सुरक्षा आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये चर्चा केल्यानंतर उपराष्ट्रपतींची सुरक्षा सीआरपीएफकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. आता दिल्ली पोलिसांकडे नाही तर उपराष्ट्रपतीच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे असणार आहे.
गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केंद्रीय सशस्त्र दलाला याबाबत पत्र लिहिले आहे. गृह मंत्रालयाला सूचना दिल्यानंतर ब्लू बुक-२०२५मधील तरतुदींनुसार, सीआरपीएफला उपराष्ट्रपतींना सुरक्षा पुरवण्याची विनंती करण्यात आली आहे. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांना देखील काही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांना उपराष्ट्रपतींच्या घरातील प्रवेशावरील नियंत्रण किंवा कार पॅसेज क्लिअरन्स ड्युटी आणि निवासस्थानाच्या बाहेरील सुरक्षेची जबाबदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.