देशभरात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये पावसाने कहर केला आहे. अनेक नद्या इशारा पातळीच्या वरुण वाहत आहेत. मात्र पंजाबच्या गुरुदासपुर जिल्ह्यात अचानक पूरस्थिती निर्माण झाली, त्यामुळे शाळेत शेकडो विद्यार्थी अडकून पडले होते.
पंजाबमध्ये मुसळधार सुरू आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. पंजाबच्या गुरुदासपुर जिल्ह्यात अचानक पुर आल्याने एका शाळेत 400 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि शिक्षक अडकून पडले आहेत. या शाळेचे नाव जवाहरलाल नवोदय विद्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
VIDEO | Punjab: Jawahar Navodaya Vidyalaya in Gurdaspur flooded after heavy rain. Efforts are underway to rescue several students and staff stranded inside the school building.
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/h8lVze7WQr— Press Trust of India (@PTI_News) August 27, 2025
अचानक पुराचे पाणी आल्याने 400 पेक्षा जास्त विद्यार्थी अडकून पडले. काही शिक्षक देखील अडकून पडले होते. पुराचे पाणी आल्याने शाळेच्या परिसरात 5 फुट इतके पाणी भरले होते. त्यामुळे विद्यार्थ्याना वरच्या मजल्यावर हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम आणि एनडीआरएफची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अत्यंत वेगाने बचावकार्य सुरू करण्यात आले.
पंजाब राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 30 ऑगस्टपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान विद्यार्थी अडकल्याचे समजताच रेस्क्यू टीम येण्यास उशीर झाला त्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली. पुरामुळे स्थिती बिकट झाल्याचे माहिती होते तर तेव्हाच का मुलांना लवकर सोडले नाही? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.