Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा आज शपथविधी

सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. भारताचे सरन्यायाधीश रमण्णा हे द्रौपदी मुर्मू यांना शपथ देणार आहेत.

  • By Ganesh Mate
Updated On: Jul 25, 2022 | 08:25 AM
नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा आज शपथविधी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : देशाच्या १५ व्या राष्ट्रपती (President) म्हणून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा (Swearing In) कार्यक्रम पार पडणार आहे. भारताचे सरन्यायाधीश रमण्णा (Chief Justice Ramana) हे द्रौपदी मुर्मू यांना शपथ देणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांचा पराभव करत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या आहेत. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला (Tribal Woman) ठरल्या आहेत.

द्रौपदी मुर्मू या ओडिशातील (Odisha) आदिवासी नेत्या आहेत. ओडिशातील बीजेपी-बीजेडी युती (BJP-BJD Alliance) सरकारमध्ये २००२ ते २००४ या काळात त्या मंत्री होत्या. त्यांनी झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणूनदेखील काम केले आहे. द्रौपदी मुर्मू या ओडिशाच्या रायरंगपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणतीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेली नाही. महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावा, अशी मागणी केली जात होती.

शपथविधी सोहळ्यापूर्वी मावळते राष्ट्रपती आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती संसदेत जातील. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्रिपरिषदेचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि सरकारचे प्रमुख, नागरी आणि लष्करी अधिकारी या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Newly elected president draupadi murmu swearing in today nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2022 | 08:25 AM

Topics:  

  • Draupadi Murmu
  • Odisha
  • Yashwant Sinha

संबंधित बातम्या

Puri Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, भाविकांमध्ये घबराट, पोलीस अलर्ट मोडवर
1

Puri Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, भाविकांमध्ये घबराट, पोलीस अलर्ट मोडवर

Shocking Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! प्रेमी जोडप्याला जनावरांसारखी वागणूक, गावकऱ्यांनी जे केलं ते अंगावर काटा आणणारं
2

Shocking Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! प्रेमी जोडप्याला जनावरांसारखी वागणूक, गावकऱ्यांनी जे केलं ते अंगावर काटा आणणारं

Breaking News : पुरी जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, 600 हून अधिक भाविक जखमी
3

Breaking News : पुरी जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, 600 हून अधिक भाविक जखमी

jagannath RathYatra 2025 : भगवान जगन्नाथ भावंडांसह निघाले मावशीकडे; ओडिशातील पुरीमध्ये रथयात्रेचा मोठा उत्साह
4

jagannath RathYatra 2025 : भगवान जगन्नाथ भावंडांसह निघाले मावशीकडे; ओडिशातील पुरीमध्ये रथयात्रेचा मोठा उत्साह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.