उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. याला कारण ठरले आहे ते म्हणजे कॅबिनेट मंत्री डॉ. संजय निषाद यांचे विधान. उत्तर प्रदेशमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री व निषाद पक्षाचे अध्यक्ष डॉ. संजय निषाद यांच्या विधानाने उत्तर प्रदेशचे राजकारण तापले आहे.
कॅबिनेट मंत्री व निषाद पक्षाचे अध्यक्ष डॉ. संजय निषाद यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. त्यांनी भाजपला थेट काही सवाल केले आहेत. लहान पक्षांपासून जर काही फायदा नाही असे भाजपला वाटत असेल तर त्यांनी युती तोडून टाकावी. 2022 मध्ये राजभर आणि पटेल समाज समाजवादी पक्षासोबत होता. तर सपा पक्ष 40 वरून 125 पोहोचली होती.
त्यानंतर आम्ही भाजपसोबत होतो तर, योगी सरकार 2.0 तयार झाले. त्यामुळे निषाद समुदायाची दिशाभूल करू नये. जे समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यामुळेच 2024 चा पराभव झाला आहे.
डॉक्टर संजय निषाद यांनी गोरखपुरचे राहणारे भाजपाचे राज्यसभेचे माजी खासदार व आधीच्या काळात बसपामध्ये मंत्री राहिलेले जय प्रकाश निषाद यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
शुभांशू शुक्लाच्या नावाने सरकार सुरू करणार ‘शिष्यवृत्ती योजना
अंतराळ प्रवासातून परतलेले हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचा सर्वांचा अभिमान आहे. नुकतेच शुभांशू शुक्ला यांचा लखनऊ येथील लोकभवन येथे सत्कार करण्यात आला. यादरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री योगी यांनी घोषणा केली की उत्तर प्रदेश सरकार शुभांशू शुक्ला यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना सुरू करेल.
यादरम्यान, मुख्यमंत्री योगी म्हणाले की, शुभांशू शुक्ला यांच्या कामगिरीमुळे देशाचा सन्मान वाढला आहे आणि जगाने अंतराळ क्षेत्रात भारताची ताकद पाहिली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन आणि अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या सत्कार समारंभात सांगितले की, चार दशकांनंतर भारताच्या एका सदस्याला अंतराळात जाण्याची संधी मिळाली आहे. “आमचे भाग्य आहे की ही संधी लखनौमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना मिळाली.”