Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…तर राज्यातील आठ महामार्ग प्रकल्प रद्द करू; नितीन गडकरींचा मुख्यमंत्री मान यांना इशारा

भूसंपादनाशी संबंधित प्रलंबित समस्या आणि बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीमुळे, अनेक कंत्राटदार सवलतीधारकांनी करार रद्द करण्याची विनंती केली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारली नाही तर आणखी आठ महामार्ग प्रकल्प रद्द करण्याशिवाय एनएचएआयकडे पर्याय राहणार नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 10, 2024 | 11:21 AM
…तर राज्यातील आठ महामार्ग प्रकल्प रद्द करू; नितीन गडकरींचा मुख्यमंत्री मान यांना इशारा
Follow Us
Close
Follow Us:

चंदीगड: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना इशारा देणारे पत्र लिहिले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारली नाही तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणखी आठ महामार्ग प्रकल्प रद्द करू, असे गडकरींनी मुख्यमंत्री मान यांना दिला आहे. या प्रकल्पांची एकूण किंमत 14,288 कोटी रुपये आहे. दिल्ली-अमृतसर-कटरा एक्स्प्रेस वेवर झालेल्या हिंसक घटनांनंतर गडकरींनी हे पत्र लिहिल्याची माहिती आहे.

गडकरींनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, NHAI दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवेसह पंजाबमध्ये अनेक ग्रीनफिल्ड आणि ब्राउनफिल्ड NH कॉरिडॉर विकसित करत आहे. पण मान यांना लिहीलेल्या NHAI अधिकारी, कंत्राटदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय भूसंपादनाबाबतही त्यांनी मुद्दे मांडले आहेत. याच वेळी गडकरींनी मान यांना लिहिलेल्या पत्रासोबत हल्ल्याची छायाचित्रेही जोडली आहेत.

गडकरींनी आपल्या पत्रात लिहीले आहे की, ” मी विनंती करतो की राज्य सरकारने तात्काळ सुधारात्मक पावले उचलावीत, एफआयआर नोंदवावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल. त्यामुळे NHAI अधिकारी आणि सवलतीधारक कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास पुन्हा निर्माण होऊ शकतो. 15 जुलै   NH प्रकल्पांच्या आढावा बैठकीत भूसंपादन आणि कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असे आश्वासन देण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

भूसंपादनाशी संबंधित प्रलंबित समस्या आणि बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीमुळे, अनेक कंत्राटदार सवलतीधारकांनी करार रद्द करण्याची विनंती केली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारली नाही तर आणखी आठ महामार्ग प्रकल्प रद्द करण्याशिवाय एनएचएआयकडे पर्याय राहणार नाही,असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच,यासंदर्भात कोणतीही प्रगती झाली नसून परिस्थिती आणखीनच बिकट झाल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे.  हे सर्व ग्रीनफिल्ड कॉरिडॉर आहेत आणि जर एक पॅकेजही रद्द केले तर संपूर्ण कॉरिडॉर निरुपयोगी होईल. NHAI ने जमिनीच्या अनुपलब्धतेचे कारण देत 104 किमी लांबीचे आणि 3,263 कोटी रुपये खर्चाचे तीन महामार्ग प्रकल्प आधीच रद्द केले असल्याचेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Nitin gadkari warned bhagwant maan that eight highway projects in the state will have to be cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2024 | 11:21 AM

Topics:  

  • Bhagwant Mann
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Nitin Gadkari News: ‘माझी बदनामी करण्याचा प्रयत्न, एक शक्तीशाली लॉबी माझ्याविरोधात…’;  नितींन गडकरींनी आरोपांना दिले उत्तर
1

Nitin Gadkari News: ‘माझी बदनामी करण्याचा प्रयत्न, एक शक्तीशाली लॉबी माझ्याविरोधात…’; नितींन गडकरींनी आरोपांना दिले उत्तर

Anjali Damania On Nitin Gadkari Fraud : अंजली दमानियांचा नितीन गडकरींवर पहिलाच मोठा आरोप; प्रत्येक किलोमीटर मागे पैसे खात..”
2

Anjali Damania On Nitin Gadkari Fraud : अंजली दमानियांचा नितीन गडकरींवर पहिलाच मोठा आरोप; प्रत्येक किलोमीटर मागे पैसे खात..”

Anjali Damania News: ‘उद्यापासून नितीन गडकरींच्या कुकर्मांची मालिका सुरू’; अंजली दमानियांच्या नव्या ट्विटने खळबळ
3

Anjali Damania News: ‘उद्यापासून नितीन गडकरींच्या कुकर्मांची मालिका सुरू’; अंजली दमानियांच्या नव्या ट्विटने खळबळ

Nikhil Gadkari Income : नितीन गडकरींचा मुलगा दिवसाला कमावतो 144 कोटी; अंजली दमानियांनी पितळ उघड पाडलं
4

Nikhil Gadkari Income : नितीन गडकरींचा मुलगा दिवसाला कमावतो 144 कोटी; अंजली दमानियांनी पितळ उघड पाडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.