Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar New CM: बिहारच्या राजकारणात सत्तांतराचे वारे: नितीश कुमारांनी दिले भावी मुख्यमंत्र्यांचे संकेत

नितीश कुमार यांनी सम्राट चौधरी यांच्याबद्दल अशा प्रकारे बोलण्याची ही पहिली वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच, कटिहारमधील एका कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या पाठीवर थाप मारली होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 18, 2026 | 03:45 PM
Nitish Kumar, Samrat Choudhary, Bihar Politics, Rajya Sabha,

Nitish Kumar, Samrat Choudhary, Bihar Politics, Rajya Sabha,

Follow Us
Close
Follow Us:
  • नितीश कुमार यांचा १० एप्रिलपासून राज्यसभा कार्यकाळ सुरू
  • पुढच्या महिन्यात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात
  • दिल्लीला जाण्यापूर्वी नितीश कुमारांचा बिहारमध्ये झंझावाती दौरा
 

Bihar New CM:  बिहारचा मुख्यमंत्री नितीश कुमार आज ( 18 मार्च) ‘समृद्धी यात्रे’ साठी जमुईमध्ये दाखल झाले. नितीश कुमार यांची राज्य सभेवर वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी काही सुचक संकेत दिले आहेत. जुमईमध्ये झालेल्या सभेत नितीश कुमार यांनी सम्राट चौधरी यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि लोकांना पाठिंब्यासाठी हात वर करण्यास सांगितले. आता ‘सम्राट’ सर्व कामे सांभाळतील, असंही त्यांनी सांगितलं. नितीश कुमार यांच्या या विधानातून ‘सम्राट चौधरी’ बिहारचे पुढील मुख्यमंत्री होतील का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तसेच, सम्राट चौधरी हे मुख्यमंत्रीपदासाठी नितीश यांची पहिली पसंती आहेत का, असाही प्रश्न विचारला जात आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जाणार

नितीश कुमार राज्यसभेवर निवडून आले आहेत. त्यांचा कार्यकाळ १० एप्रिलपासून सुरू होत आहे. ते पुढच्या महिन्यात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात. त्यानंतर बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होईल. यावेळी भाजपला मुख्यमंत्री मिळण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात, सम्राट चौधरी यांच्याबाबत नितीश कुमार यांचे वक्तव्य अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले जात आहे.नितीश कुमार यांनी सम्राट चौधरी यांच्याबद्दल अशा प्रकारे बोलण्याची ही पहिली वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच, कटिहारमधील एका कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या पाठीवर थाप मारली होती.

बंगालच्या निम्म्या आमदारांवर फौजदारी खटले; ADR कडून रिपोर्ट जारी

कुंडघाट जलाशय प्रकल्पाचे उद्घाटन

समृद्धी यात्रेअंतर्गत जमुई येथे दाखल झालेल्या नितीश कुमार यांनी कुंडघाट जलाशय प्रकल्पाचे उद्घाटन केले, जागेची पाहणी केली आणि विविध स्टॉल्सना भेट दिली. आज (बुधवार) समृद्धी यात्रेच्या चौथ्या टप्प्याचा दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांचा आज नवादा येथेही एक कार्यक्रम आहे. नितीश कुमार दिल्लीला (राज्यसभा) रवाना होण्यापूर्वी हे सर्व दौरे महत्त्वाचे मानले जात आहेत.

भागलपूरमध्ये अँकरच्या चुकीमुळे चर्चांना उधाण

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मंगळवारी समृद्धी यात्रेनिमित्त भागलपूर दौऱ्यावर होते. ‘जन संवाद’ कार्यक्रमादरम्यान पाहुण्यांची ओळख करून देताना निवेदिकेने (अँकर) उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचा उल्लेख चुकून “मुख्यमंत्री” असा केला. या अनपेक्षित उल्लेखामुळे सम्राट चौधरी काहीसे अस्वस्थ झाले, मात्र मंचावर उपस्थित असलेले नितीश कुमार यांनी हसून त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि परिस्थिती सांभाळून घेतली. या घटनेमुळे उपस्थितांमध्ये काही काळ हास्यकल्लोळ झाला.

Rajyasabha Live : “राजकारणामध्ये कधीही फुलस्टॉप नसतो…; राज्यसभेमध्ये PM मोदींचे सूचक वक्तव्य चर्चेत

बिहारच्या पुढील मुख्यमंत्रिपदाबाबत तर्कवितर्क

या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी एका कार्यक्रमात नितीश कुमार यांनी पुन्हा सम्राट चौधरींच्या खांद्यावर हात ठेवून “आता ते सर्व काम करतील,” असे विधान केले. भागलपूरमधील अँकरची चूक आणि नितीश कुमारांचे हे ताजे विधान यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. नितीश कुमार राज्यसभेत गेल्यास सम्राट चौधरी बिहारचे पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात, अशा चर्चांना आता वेग आला आहे.

 

Web Title: Nitish kumar to join rajya sabha speculations rise over samrat choudhary as next bihar cm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Nitish Kumar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.