नवी दिल्ली : सिंगापूरनंतर आता भारतातही हळूहळू कोरोनाचा (Coronavirus) प्रसार होत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, देशभरात आतापर्यंत 324 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. KP-1 आणि KP-2 या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अनेक राज्यांमध्ये हा संसर्ग पसरला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व जेएन 1 चे सब व्हेरिएंट आहेत आणि रुग्णालयात दाखल आणि गंभीर प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. काळजी किंवा घाबरण्याचे कारण नाही. म्युटेशन वेगाने होत आणि हे SARS-CoV2 व्हायरसचे नैसर्गिक वर्तन आहे. व्हायरसमुळे रोगाच्या तीव्रतेमध्ये कोणताही बदल शोधण्यासाठी संरचित पद्धतीने रुग्णालयांमधून नमुने देखील घेतले जातात.
भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) ने संकलित केलेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की, सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये KP.1 ची 34 प्रकरणे आढळून आली आहेत, त्यापैकी 23 प्रकरणे पश्चिम बंगालमधून नोंदवली गेली आहेत.