Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाही कफ सिरप; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

अनेक बालमृत्यू आणि कफ सिरपमुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय आता कफ सिरप मिळणार नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 29, 2025 | 07:25 AM
आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाही कफ सिरप; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाही कफ सिरप; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : कफ सिरप घेतल्याने अनेक बालकांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. त्यानंतर कफ सिपरचा मुद्दा चर्चेत आला होता. असे असताना आता अनेक बालमृत्यू आणि कफ सिरपमुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय आता कफ सिरप मिळणार नाही. कफ सिरपच्या मनमानी विक्रीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

सध्या बहुतेक कफ सिरप डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध दुकानांमध्ये विकले जात असल्याचे समोर आले आहे. मात्र, आता असे करता येणार नाही. औषध विक्रेत्यांना आता प्रत्येक प्रिस्क्रिप्शनची नोंद ठेवणे आवश्यक असेल. शिवाय, कफ सिरपच्या गुणवत्तेबाबत कठोर नियम आवश्यक असतील. औषध ​​सल्लागार समितीच्या मंजुरीनंतर नियम कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या सर्वोच्च नियामक असलेल्या औषध सल्लागार समितीने कफ सिरपचा समावेश काढून टाकण्यास मान्यता दिली आहे. आता कफ सिरप खरेदी करताना डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन अनिवार्य असणार आहे.

हेदेखील वाचा : Cough Syrup Dead : कफ सिरप प्यायल्याने महिलेचा मृत्यू; ५०० हून अधिक बाटल्या जप्त

कफ सिरपमुळे अनेकांचा मृत्यू

गेल्या तीन वर्षांत भारतातून निर्यात केलेल्या अनेक कफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल (DEG) आणि इथिलीन ग्लायकॉल (EG) सारखी हानिकारक रसायने आढळल्याने हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या हानिकारक रसायनामुळे गांबिया, उझबेकिस्तान आणि कॅमेरूनमध्ये अनेक मुलांचा मृत्यू झाला. अलिकडेच मध्य प्रदेशातही काही मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. खोकला आणि सर्दीसारख्या सामान्य आजारांवरही सरकार लोकांना स्वतःहून औषधोपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यादृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले जात आहे.

बाल सुरक्षेला प्राधान्य

केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले की, मुलांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असणार आहे. यामुळे गैरवापर आणि दुष्परिणाम टाळता येतील. अनेक पालक डॉक्टरांचा सल्ला न घेता त्यांच्या मुलांना सिरप देत आहेत. त्यामुळे आता याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेदेखील वाचा : Air Pollution Special Insurance: श्वसन आजार झपाट्याने वाढताच विमा कंपन्यांचे मोठे पाऊल! विशेष हेल्थ इन्शुरन्स प्लॅन लॉन्च

Web Title: Now cough syrup will not be available without doctors prescription

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 07:14 AM

Topics:  

  • Cough syrup
  • Government Decision
  • Modi government

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.