कोरोनाचा NB.1.8.1 व्हेरिएंट बनलाय आणखी धोकादायक; WHO ने जारी केल्या मार्गदर्शक सूचना
नवी दिल्ली : 2020 मध्ये देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले होते. भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे दिसत आहे. अमेरिका ते दक्षिण कोरियापर्यंत जगभरात कोविडची प्रकरणे दिसू लागली आहेत. कोरोना व्हायरस देशभरात पुन्हा एकदा भारतात शिरकाव करू शकतो. त्यामुळे त्यासाठी आतापासूनच खबरदारी घ्यायला हवी, असे सांगण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : पाकिस्तानात वाढतायेत मंकीपॉक्सचे रुग्ण; आतापर्यंत इतक्या रुग्णांची नोंद
कोरोना पुन्हा एकदा भारतात येणार असल्याचे सांगितले जात आहे. 2020-21 पर्यंत देशाने कोविड महामारीचा सामना केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोविड महामारी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या अमेरिकेत कोविड प्रकरणांची संख्या वाढत आहे. देशातील 25 राज्यांमध्ये कोविड संसर्ग वाढत आहे. सध्या अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये 4 हजारांहून अधिक लोक दाखल आहेत.
डब्ल्यूएचओचा अहवाल सादर
डब्ल्यूएचओने सध्या भारतात किती सक्रिय प्रकरणे नोंदवली आहेत. याचा अहवाल सादर केला. त्यानुसार, जून ते जुलै दरम्यान भारतात 908 कोविड प्रकरणे नोंदवली गेली आणि या कालावधीत 2 मृत्यू देखील नोंदवले गेले. भारतातील परिस्थिती इतर देशांसारखी गंभीर नाही. परंतु, कोविडच्या कहरासाठी आपल्याला तयार राहण्याची गरज आहे, असे डब्ल्यूएचओने सांगितले.
कोरोना केसेसमध्ये 11 टक्क्यांनी वाढ
जगात या विषाणूमुळे 26 टक्के मृत्यू आणि कोविड प्रकरणांमध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. भारतात, केपी. 2 पहिल्यांदा ओडिशामध्ये डिसेंबर 2023 मध्ये आढळून आला. भारतातील अनेक राज्यांमध्ये 279 सक्रिय प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कोविड प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे. आसाम, दिल्ली, गुजरात, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये कोविड संसर्गामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
हेदेखील वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेचा भंग करण्याचा प्रयत्न; भर सभेत राडा, पाहा व्हिडीओ