Photo Credit- Social media
पेनसिल्व्हेनिया: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेनसिल्व्हेनियातील रॅलीमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेचा भंग झाल्याची माहिती समोर आली आहे. जॉन्सटाउन, पेनसिल्व्हेनिया येथे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या रॅलीत एका अज्ञात व्यक्तीने मीडिया गॅलरीत प्रवेश करत त्यांच्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ घेराव घातला आणि टाझरच्या सहाय्याने त्याला ताब्यात घेतले.
पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे एका रॅलीदरम्यान ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाल्यानंतर काही आठवड्यांतच ही घटना घडल्याने अमेरिकेच एकच खळबळ माजली आहे. गेल्या महिन्यातच एका सभेला संबोधित करताना ट्रम्प यांच्या कानाजवळून गोळी लगून गेली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा: अमेरिका-भारत संरक्षण परिषद पुन्हा होणार; स्टॅनफोर्ड विद्यापीठात केले जाणार आयोजन
शुक्रवारी पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रम्प यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान एका व्यक्तीने प्रसारमाध्यमांच्या परिसरात असलेल्या सायकल रॅकवरून उडी मारली आणि टेलिव्हिजन रिपोर्टर्स आणि कॅमेरे उभे असलेल्या स्टेजवर चढू लागला. त्याच्या जवळ उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळातच पोलीस अधिकारी देखील त्यांच्यासोबत सामील झाले. त्याला ताबडतोब खाली आणण्यात आले आणि सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतले.
A Deranged Democrat tried to breach the security at Trump’s rally in Johnstown, Pennsylvania.
Police responded In a matter of seconds the man was stopped, secured, and REMOVED!
Just over 2 months ago Trump was shot in butler , PA
Does the Secret Service exist at all??? pic.twitter.com/RLxQlOQO0b
— Chuckyfamous! (@Nem_Famous) August 31, 2024
काही मिनिटांनंतर, मॉम्स फॉर लिबर्टी या अतिउजव्या गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान गर्दीतील आणखी एका व्यक्तीला हातकडी घालून मैदानाबाहेर नेण्यात आले. तथापि, हे प्राथमिक सुरक्षा उल्लंघनाच्या घटनेशी संबंधित आहे की नाही याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
हेदेखील वाचा: नासाने पृथ्वीचे लपलेले विद्युत क्षेत्र काढले शोधून; पाहून शास्त्रज्ञही थक्क