Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपला दक्षिणेत धक्का, या पक्षाने सोडली NDA ची साथ, राजकीय समीकरणं बदलणार

तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखालील ACRCC ने भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ सोडल्याची अधिकृत घोषणा केली आहे. चेन्नईत झालेल्या उच्च स्तरिय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 31, 2025 | 09:54 PM
भाजपला दक्षिणेत मोठा धक्का, या पक्षाने सोडली साथ, राजकीय समीकरणं बदलणार

भाजपला दक्षिणेत मोठा धक्का, या पक्षाने सोडली साथ, राजकीय समीकरणं बदलणार

Follow Us
Close
Follow Us:

तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी उडतायेत. माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम (OPS) यांच्या नेतृत्वाखालील AIADMK कार्यकर्त्यांच्या हक्कांसाठी स्थापन करण्यात आलेल्या ACRCC ने भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सोडल्याची अधिकृत घोषणा केली आहे. चेन्नईत पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील सत्तासमीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची चिन्हं आहेत.

पाकिस्तानमध्ये नक्की तेलाचे साठे आहेत का? पाकिस्तानसोबतच्या ट्रम्प यांच्या करारावर शशी थरूर यांची प्रतिक्रिया म्हणाले…

NDA सोडण्यामागचं नक्की कारण काय?

पन्नीरसेल्वम यांचे जवळचे सहकारी आणि ACRCC चे सल्लागार पनरुती एस. रामचंद्रन यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं की, NDA कडून पन्नीरसेल्वम यांची सातत्याने उपेक्षा केली जात होती. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अलिकडील तामिळनाडू दौऱ्यात पन्नीरसेल्वम यांना भेटण्याची संधी नाकारण्यात आली. हे अपमानास्पद होतं. त्यामुळेच NDA सोडण्याचा निर्णय अपरिहार्य ठरला, असं रामचंद्रन यांनी स्पष्ट केलं.

पन्नीरसेल्वम यांचं मौन आणि स्टॅलिन यांची भेट

पन्नीरसेल्वम यांनी पत्रकार परिषदेत NDA बाबत थेट काही भाष्य केलं नाही. त्यांनी फक्त, “रामचंद्रन काय म्हणत आहेत, तेच ऐका,” असं म्हणत संवाद टाळला. मात्र त्यांच्या अलिकडील मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासोबतच्या ‘योगायोगाने’ झालेल्या भेटीने चर्चांना आणखी उधाण दिलं आहे.

पन्नीरसेल्वम म्हणाले की, “मी सकाळी फिरण्यासाठी थियोसोफिकल सोसायटीत जातो. तिथेच स्टॅलिन आले होते. ही फक्त एक अपघातानं झालेली भेट होती. पण राजकारणात ‘योगायोग’ क्वचितच असतो, असं मानलं जात असल्यामुळे यामागे काही वेगळीच रणनीती असण्याची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त होतोय.

Parliament Session : ‘शेतकरी, एमएसएमई, व्यावसायिकांना…’, अमेरिकेच्या टॅरिफवर पियुष गोयल यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

पन्नीरसेल्वम AIADMK चे ज्येष्ठ नेते असून ते तीन वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्री राहिले आहेत. जयललिता यांच्या निधनानंतर AIADMK मध्ये फूट पडली आणि OPS यांनी वेगळा गट तयार केला.2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी NDA सोबत आघाडी केली होती, मात्र आता त्यांनी या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तरी पन्नीरसेल्वम यांच्या पुढील रणनीतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही. मात्र त्यांचं राज्यव्यापी अभियान, शांतता आणि धोरणात्मक हालचालींवरून मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: O panneerselvam exits nda decision was taken chennai high level meeting latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 08:47 PM

Topics:  

  • Indian Political News
  • NDA
  • Tamil Nadu

संबंधित बातम्या

Bihar Election Result 2025 : नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री होणार! महिला रोजगार योजनेमुळे बिहारमध्ये वारं फिरलं?
1

Bihar Election Result 2025 : नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री होणार! महिला रोजगार योजनेमुळे बिहारमध्ये वारं फिरलं?

Bihar Election Result 2025 : बिहार निवडणुकीत NDA 190 ने आघाडीवर; तर रितेश पांडे, तेजप्रताप, तेजस्वी आणि खेसारी लाल यादव पिछाडीवर
2

Bihar Election Result 2025 : बिहार निवडणुकीत NDA 190 ने आघाडीवर; तर रितेश पांडे, तेजप्रताप, तेजस्वी आणि खेसारी लाल यादव पिछाडीवर

Bihar Election Result 2025 : निवडणूक आयोगाच्या वेबसाइटमध्ये तांत्रिक बिघाड, आघाडीवरील उमेदवार ‘पराभूत’ म्हणून घोषित!
3

Bihar Election Result 2025 : निवडणूक आयोगाच्या वेबसाइटमध्ये तांत्रिक बिघाड, आघाडीवरील उमेदवार ‘पराभूत’ म्हणून घोषित!

Share Market Crash: बिहार निवडणूक निकालांचा शेअर बाजारावर तगडा परिणाम! भारतीय बाजार उघडताच घसरला
4

Share Market Crash: बिहार निवडणूक निकालांचा शेअर बाजारावर तगडा परिणाम! भारतीय बाजार उघडताच घसरला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.