Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Odisha Politics: ओडिशा काँग्रेसमध्ये बंडाचा झटका! राज्यसभा निवडणुकीत क्रॉस-व्होटिंग करणाऱ्या ३ आमदारांचे निलंबन

ओडिशामध्ये, बीजेडीच्या आठ आमदारांनी क्रॉस-व्होटिंग केल्यामुळे विरोधी पक्षाचे उमेदवार दत्तेश्वर होता यांचा पराभव झाला. दत्तेश्वर होता यांना बीजेडीने उमेदवारी दिली होती, तर काँग्रेसने त्यांना पाठिंबा जाहीर केला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 17, 2026 | 06:15 PM
Odisha Rajya Sabha Election 2026, Congress MLA Suspension,

Odisha Rajya Sabha Election 2026, Congress MLA Suspension,

Follow Us
Close
Follow Us:
  • ओडिशामध्ये राज्यसभा निवडणुकीत क्रॉस-व्होटिंग
  •  काँग्रेसचे तीन आमदार निलंबित
  • या आमदारांनी पक्षाशी गद्दारी केली
 

 Cross Voting Odisha : ओडिशामध्ये राज्यसभा निवडणुकीत क्रॉस-व्होटिंग केल्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला. या प्रकरणी ओडिशा काँग्रेसने कारवाई सुरू केली आहे. भाजप-समर्थित अपक्ष उमेदवार दिलीप राय यांच्या बाजूने मतदान करणाऱ्या तीन आमदारांना पक्षाने निलंबित केले आहे. निलंबित आमदारांमध्ये सनखेमुंडीचे रमेश चंद्र जेना, मोहनाचे दशरथी गोमांगो आणि कटकच्या सोफिया फिरदौस यांचा समावेश आहे.

पक्षाच्या सूचना असतानाही या आमदारांनी सोमवारी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत दिलीप राय यांच्या बाजूने मतदान केले. या प्रकरणी ओडिशा काँग्रेसने सोशल मीडियावर , ज्यांनी काँग्रेसशी गद्दारी केली आहे, त्यांनी देशाशी गद्दारी केली. अशी पोस्ट करत वरील आमदारांना निलंबित केलं आहे.

Maternity Leave वर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; ‘दत्तक’ घेणाऱ्या मातांनाही मिळणार प्रसूती रजेचा हक्क!

काँग्रेस अध्यक्षांना नोटीस पाठवणार

ओडिशा काँग्रेसच्या मीडिया सेलचे प्रभारी ऑर्बिंद दास म्हणाले की, संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या हिताच्या विरोधात काम केले आणि आता त्यांचे विधानसभेतील सदस्यत्व देखील रद्द केले जाईल. त्या दृष्टीने ओडिशा काँग्रेसकडून लवकरच पक्ष अध्यक्षांना नोटीस पाठवली जाणार आहे.

राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष भक्त चरण दास म्हणाले की, या आमदारांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. त्यांना संविधानाच्या १० व्या अनुसूचीनुसार त्यांना विधानसभेतून काढून टाकण्यात येईल. महत्त्वाची बाब म्हणजे हायकमांडने या निर्णयाचे कौतुक केले असून तो आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

रस्त्यावर होळी तर नमाज पठन का नाही? ईदपूर्वी सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने थेट दिले CM योगींना आव्हान

बिहार आणि हरियाणामध्येही कारवाई

ओडिशामध्ये, बीजेडीच्या आठ आमदारांनी क्रॉस-व्होटिंग केल्यामुळे विरोधी पक्षाचे उमेदवार दत्तेश्वर होता यांचा पराभव झाला. दत्तेश्वर होता यांना बीजेडीने उमेदवारी दिली होती, तर काँग्रेसने त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. बिहार आणि हरियाणामध्येही अशीच कारवाई केली जाऊ शकते, असा काँग्रेसचा विश्वास आहे. बिहारमध्ये, सहज विजय मिळवूनही विरोधी उमेदवाराचा पराभव झाला.

हरियाणामध्येही क्रॉस-व्होटिंग

हरियाणामध्ये काँग्रेसचे उमेदवार करमवीर सिंग बौध जिंकले, पण पक्षाची रणनीती अयशस्वी ठरत असल्याचे दिसत होते. येथे पाच आमदारांनी पक्षापासून फारकत घेऊन क्रॉस-व्होटिंग केले. याशिवाय, चार मते अवैध ठरवण्यात आली. ३७ जागा असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ २८ मते मिळाली. हरियाणा आणि बिहारमधील कोणत्या नेत्यांनी पक्षाच्या उमेदवारांना मतदान केले नाही, याची चौकशी पक्ष आता करत आहे.

 

Web Title: Odisha rajya sabha crisis congress suspends 3 mlas for cross voting in favor of dilip ray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Odisha news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.