रमजान ईदला रस्त्यावर नमाज पठन करण्यावरुन सय्यद अयुबचे सीएम योगी आदित्यनाथ यांना चॅलेंज दिले (फोटो - istock)
हैदराबाद युथ करेजचा संस्थापक सय्यद अयुबने सोशल मीडियावर धक्कादायक आवाहन करणारा व्हिडिओ शेअर केला. १५ मार्चच्या रात्री हा व्हिडिओ पोस्ट केल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला आहे की, “इन्शा अल्लाह, केवळ संभलमध्येच नाही, तर संपूर्ण भारतात रस्त्यावर नमाज अदा केली जाईल.” असे म्हणत त्याने मुस्लीम बांधवांना ईदच्या दिवशी संपूर्ण देशात रस्त्यावर नमाज पठन करण्याचे आवाहन केले आहे.
हे देखील वाचा : ममतादीदींच्या अभेद्य किल्ल्याला BJP लावणार सुरुंग? दक्षिण कोलकात्यामध्ये कोण मारणार बाजी
UP चे मुख्यमंत्री योगींना थेट आव्हान
सोशल मीडिया व्हिडिओमध्ये, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स अयुब याने योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात अपमानजनक भाषा वापरली आणि त्यांच्या सरकारवर मुस्लिमांसोबत भेदभाव केल्याचा आरोप केला. इंस्टाग्रामवर जवळपास २० लाख फॉलोअर्स असल्याचा दावा करणाऱ्या अयुब यांनी म्हटले की, जर ईदगाह भरले असतील, तर मुस्लिम रस्त्यावर नमाज अदा करतील आणि त्यांना तुरुंगवास किंवा खटल्याच्या धमक्यांची भीती नाही. होळी साजरी करण्यास किंवा रस्त्यावर भांडण्यास हरकत नाही, परंतु नमाज अदा करण्यास विरोध आहे, संविधान सर्व नागरिकांना समान हक्क प्रदान करते आणि “या भारतात माझाही तितकाच हक्क आहे, जितका तुमचा आहे.” अशी भूमिका सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स सय्यद अयुबने दिली आहे.
हे देखील वाचा : आखाती तणावाचा भारतावर मोठा परिणाम? पेट्रोलपासून निर्यातीपर्यंत अर्थव्यवस्थेला बसू शकतो फटका
संभल पोलीस अधिकाऱ्याचे निवेदन
१२ मार्च रोजी शांतता समितीच्या बैठकीत कुलदीप कुमार यांनी सार्वजनिक रस्त्यांवर नमाज अदा करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे सांगितल्यावर हा वाद अधिकच वाढला. असे करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि त्यांना तुरुंगवासही भोगावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.






