Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दोन मिनिटांच्या लैंगिक आनंदावर…’, कोलकाता उच्च न्यायालयाने युवतींना दिला अजब सल्ला; सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

  • By युवराज भगत
Updated On: Dec 08, 2023 | 05:32 PM
‘दोन मिनिटांच्या लैंगिक आनंदावर…’, कोलकाता उच्च न्यायालयाने युवतींना दिला अजब सल्ला; सर्वोच्च न्यायालयाची नाराजी
Follow Us
Close
Follow Us:

Calcutta High Court : कोलकाता उच्च न्यायालयाने ऑक्टोबर महिन्यात एका प्रकरणात केलेली टिप्पणी वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. आता याचे पडसाद थेट सर्वोच्च न्यायालयात उमटले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या टिप्पणीवर नाराजी व्यक्त केली असून न्यायाधीशांनी वैयक्तिक विधान व्यक्त करू नये, अशी तंबीच सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. “किशोरवयीन मुलींनी लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवावे आणि दोन मिनिटांच्या आनंदावर अधिक लक्ष देऊ नये”, अशी टिप्पणी कोलकाता उच्च न्यायालयाने एका बलात्कार प्रकरणात दिली होती. उच्च न्यायालयाचे हे विधान आपत्तीजनक असून संविधानाच्या अनुच्छेद २१ चे त्यामुळे उल्लंघन होत आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.

न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पीडित मुलगी आणि पश्चिम बंगाल सरकारला नोटीस पाठविली आहे. या नोटीशीला ४ जानेवारी पर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. न्यायाधीश अभय ओक आणि न्यायाधीश पंकज मिथ्थल यांच्या खंडपीठाने आपल्या निर्देशात म्हटले की, अशा प्रकरणांमध्ये न्यायालयाने वैयक्तिक टिप्पणी करण्यापासून स्वतःला रोखले पाहीजे. अशा विधानामुळे संविधानाने किशोरवयीन मुला-मुलींना दिलेल्या अधिकाराचे हनन होत आहे. या प्रकरणात आरोपीला मुक्त करण्याचे कोणतेही उचित कारण समोर येत नाही. उच्च न्यायालयाने या प्रकरणी दिलेला संपूर्ण निकालाची प्रत सर्वोच्च न्यायालयाने रजिस्ट्री कार्यालयाकडून मागितली आहे. तसेच वरिष्ठ विधीज्ञ माधवी दिवाण यांची या प्रकरणी न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती केली आहे.

प्रकरण काय होते?
१८ ऑक्टोबर रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारासंदर्भातील प्रकरणात निकाल दिला होता. न्यायाधीश चित्तरंजन दास आणि न्यायाधीश पार्थसारथी सेन यांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचा करणाऱ्या आरोपीला पॉक्सो कायद्यातील कलमातून सूट देत, त्याची निर्दोष मुक्तता केली. मुला-मुलींनी आपल्या संमतीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले, असे सांगून उच्च न्यायालयाने प्रकरण निकाली काढले. एवढेच नाही तर हा निकाल देत असताना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी युवा पिढीला लैंगिक संबंधाबाबतचे त्यांचे विचारही सांगितले.

लैंगिक इच्छांवर नियंत्रण

उच्च न्यायालयाने म्हटले की, किशोरवयीन मुलींनी आपल्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवायला हवे. दोन मिनिटांच्या आनंदावर त्यांनी अधिक लक्ष देऊ नये. तसेच मुलांनीही मुलींच्या प्रतिष्ठेचा सन्मान ठेवायला हवा. उच्च न्यायालयाच्या प्रकटीकरणाची माहिती सर्वोच्च न्यायालयाला मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःहून या प्रकरणी दखल घेऊन सुनावणी घेतली आणि कोलकाता उच्च न्यायालय आणि राज्य सरकारला नोटीस पाठविली आहे.

 

Web Title: On two minutes of sexual pleasure calcutta high court gives strange advice to young women displeasure of supreme court nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2023 | 05:32 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.