ISRO Aditya L1 : भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO ने इतिहास रचला आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अवकाश संशोधनकांनी आणखी एक मोठ यश मिळवले आहे. इस्रोने आदित्य यानाला यशस्वीरित्या सूर्याजवळच्या लॅग्रेज पॉइंट म्हणजे L1 च्या जवळपास हॅलो ऑर्बिटमध्ये स्थापित केलं आहे. सूर्याचा जवळून अभ्यास करण्यासाठी आदित्य एल 1 मिशनची आखणी केली आहे. L1 पॉइंटवर पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर एक टक्क्यावर येतं. इस्रोने मागच्यावर्षी 2 सप्टेंबरला सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य सोलर ऑब्जर्वेटरीला सूर्याच्या दिशेने पाठवलेलं. भारताची सूर्याजवळची ही एक वेधशाळाच आहे.
India creates yet another landmark. India’s first solar observatory Aditya-L1 reaches it’s destination. It is a testament to the relentless dedication of our scientists in realising among the most complex and intricate space missions. I join the nation in applauding this…
— Narendra Modi (@narendramodi) January 6, 2024
सूर्याच्या बाह्य वातावरणाचा करणार अभ्यास
देशाच्या पहिल्या सौर मोहिमेतील ‘आदित्य एल १’ उपग्रहाने सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षण समतोल बिंदूंपैकी एक बिंदू- ‘लँगरेंज पॉइंट १’ (एल-१) वर यशस्वीरित्या पोहोचण्याचा विक्रम केला आहे. पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर सूर्याच्या दिशेने हे यान ११० दिवसांनी पोहोचले आहे. ‘आदित्य-एल १’ ही अवकाशीय सौर वेधशाळा असून, ती सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणार आहे. हा यशस्वी टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रोचे अभिनंदन व्यक्त केले आहे.
L1 पॉइंटवरुन सूर्यावर सतत नजर
आदित्य एल-1ला पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये जो लॅग्रेज (L1) पॉइंट आहे, त्या हॅलो कक्षेत स्थापन करण्यात आलं. लॅग्रेज (L1) पॉइंटवर पृथ्वी आणि सूर्यामधील गुरुत्वाकर्षण निष्क्रिय होतं. L1 पॉइंटवरुन सूर्यावर सतत नजर ठेवली जाईल. या यानामुळे सूर्याजवळ घडणाऱ्या घडामोडी आणि अवकाश हवामानावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करता येईल.
मिशनच टार्गेट काय?
आदित्य-एल1 चे यशस्वी प्रक्षेपण
इस्रोच्या पीएसएलवी-सी57 रॉकेटने 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन आदित्य-एल1 चे यशस्वी प्रक्षेपण केले होते. आदित्य एल 1 वेगवेगळ्या टप्प्यांमधून पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राबाहेर गेले. फक्त सूर्याचा अभ्यास आणि प्रत्येक छोट्यात छोट्या घडामोडीची माहिती देणे हाच ‘आदित्य एल1’ मिशनचा उद्देश आहे. सौर वातावरण, सूर्याची ऊर्जा, सूर्याचा पृष्ठभाग, सूर्यावर येणारे भूकंप हे उद्देश या मिशनमधून साध्य करण्यात येतील.
आदित्य एल1 मध्ये किती उपकरण?
आदित्य एल1 मध्ये सात साइंटिफिक पेलोड आहेत. हे सर्व पेलोड इस्रो आणि राष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळेने विकसित केले आहेत. या पेलोडसना विद्युत चुंबकीय कण आणि चुंबकीय क्षेत्र डिटेक्टर्सचा उपयोग करुन प्रकाश मंडल, क्रोमोस्फीयर आणि सूर्याचा बाहेरील भाग कोरोनाचा निरीक्षण करण्यासाठी बनवण्यात आलं आहे.
50 हजार कोटी कसे वाचणार?
आदित्य-एल1 मिशनच्या प्रोजेक्ट डायरेक्टर निगार शाजी यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, “या मिशनद्वारे फक्त सूर्याचाच अभ्यास करता येणार नाही, तर 400 कोटीच्या या प्रोजेक्टमधून सूर्यावर येणाऱ्या वादळांची माहिती मिळेल. त्यामुळे भारताचे 50 हजार कोटींचे अनेक उपग्रह सुरक्षित ठेवता येतील. एकप्रकारे ही देशाची मदतच आहे. हा प्रोजेक्ट देशासाठी खूप महत्त्वाचा आहे”