Petrol Pump Profit: पेट्रोल पंप सुरू करण्याचा विचार करताय? 1 लीटरमागे किती कमिशन मिळते? एकदा बातमी वाचाच...
Petrol- DieselRate: भारतात सध्या अनेक वाहने रोज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करत असतात. अनेक कंपन्यांचे ट्रक, खासगी वाहने, सार्वजनिक वाहने वाहतूक करत असतात. सर्व वाहनांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी महत्वाची गोष्ट भासते ती म्हणजे पेट्रोल आणि डिझेल. पेट्रोल आणि डिझेल हे वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचे साधन आहे. भारत सरकार पेट्रोल आणि डिझेल हे परदेशातून आयात करत असते.
आपल्याला पेट्रोल आणि डिझेल हे पेट्रोल पंपावरून मिळते. दरम्यान देशात लाखो पेट्रोल-डिझेलचे पंप आहेत. दरम्यान केंद्रशासित प्रदेशात आणि पर राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर हे वेगवेगळे असतात. प्रत्येक राज्य सरकारचा टॅक्स, जीएसटी यामुळे प्रत्येक राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी जास्त होत असतात. मात्र पेट्रोल पंप चालवणाऱ्या मालकांना यामध्ये किती कमिशन मिळते याकहा तुम्ही कधी विचार केला आहे? तुम्ही जर का पेट्रोल पंप सुरू करण्याच्या विचारात असाल तर याबद्दल जाणून घेणे अवशेक आहे. चला तर आज याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
पेट्रोल आणि डिझेलची किंमत प्रत्येक राज्यात वेगवेगळी असते. तेल कंपन्या पेट्रोलची किंमत निश्चित करत असतात. एखाद्या राज्यात पेट्रोल 95 रुपये आहे तर, दुसऱ्या राज्यात 105 रुपये प्रती लीटर असा दर आहे. पेट्रोलवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार कर आकारत असते. त्यानुसार त्याच्या किंमती ठरत असतात. पेट्रोल – डिझेलच्या किंमती वाढल्यास सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण येतो.
पेट्रोल विकणाऱ्या पंप मालकांना किती कमिशन मिळते याबद्दल जाणून घेऊयात. पेट्रोल विक्री केल्यानंतर पेट्रोल विकणाऱ्या पंपाला देखील याचे कमिशन मिळते. पेट्रोल पंप मालकांना प्रती किलोलीटर म्हणजेच 1000 लीटरसाठी 1868 रुपये कमिशन मिळते. याप्रमाणे हिशेब केल्यास पेट्रोल पंप चलकांना एक लीटर पेट्रोलमागे 2 रुपये कमिशन मिळते. देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोल विकणाऱ्या पंप चालकांना सुमारे 2.5 रुपये देखील कमिशन मिळते.
पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू, UP आणि बिहारवाल्यांना मिळाली मोठी भेट
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा परिणाम गुरुवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही दिसून आला. देशभरातील सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये आज बदल झाला आहे आणि आज बहुतेक शहरांमध्ये तेलाच्या किमतीत घट दिसून येत आहे. तथापि, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आजही तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
हेही वाचा: Petrol Diesel Prices: पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू, UP आणि बिहारवाल्यांना मिळाली मोठी भेट
सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोल १२ पैशांनी महाग झाले आहे आणि ते उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात ९४.७० रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. डिझेलमध्येही १४ पैशांनी वाढ झाली आणि ते ८७.८१ रुपये प्रति लिटरवर पोहोचले. गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा), पेट्रोल १० पैशांच्या घसरणीसह ९४.७७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे, तर डिझेल १२ पैशांच्या घसरणीनंतर ८७.८९ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे पेट्रोल १७ पैशांनी घसरून १०५.४१ रुपये आणि डिझेल १६ पैशांनी कमी होऊन ९२.२६ रुपये प्रति लिटर झाले आहे.