Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi News: लोकसभेत विरोधकांना बोलू दिलं जात नाही; राहुल गांधींचा ओम बिर्लांवर थेट आरोप

सभागृहाच्या शिष्टाचाराचे आणि परंपरांचे पालन करणे सर्व सदस्यांसाठी महत्त्वाचे आहे. काही खासदारांनी संसदीय परंपरांचे पालन केले नाही, अशा अनेक घटना घडल्या आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 26, 2025 | 04:53 PM
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने किती विमानं गमावली? राहुल गांधींचा एस. जयशंकर यांना थेट सवाल

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने किती विमानं गमावली? राहुल गांधींचा एस. जयशंकर यांना थेट सवाल

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली:  काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यावर सभागृहात बोलण्याची संधी न दिल्याचा आरोप केला. त्यांनी विधान केले की, लोकसभा लोकशाही पद्धतीने चालवली जात नसून, महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्याच्या त्यांच्या विनंत्या सातत्याने दुर्लक्षित केल्या जात आहेत.

राहुल गांधी म्हणाले, “परंपरेनुसार विरोधी पक्षनेत्याला बोलण्याची संधी दिली जाते. मात्र, मी उभा राहिलो की मला बोलण्याची परवानगी नाकारली जाते. आम्हाला आमची भूमिका मांडण्याचा अधिकारच दिला जात नाही. मी शांत बसलो होतो, तरीही मला संधी दिली नाही. लोकशाहीमध्ये सरकार आणि विरोधकांना समान स्थान असते, पण या सभागृहात फक्त सरकारलाच महत्त्व दिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळ्याबद्दल भाषण दिले, त्यावर मला माझे विचार जोडायचे होते. बेरोजगारीसारख्या गंभीर विषयावर बोलायचे होते, पण संधीच दिली नाही.”

New UPI Rules: 1 एप्रिलपासून UPI ​​नियमांमध्ये होणार मोठा बदल, NPCI च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काय?

“संसदीय परंपरेचे उल्लंघन” – काँग्रेसचे आरोप

मात्र, विरोधी पक्षनेते जेव्हा सभागृहात त्यांच्या बाजूने भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना नियम दाखवून थांबवले जाते. त्याउलट, सरकारचे मंत्री किंवा भाजप खासदार उठले, की त्यांचे माइक लगेच सुरू होतात आणि त्यांना बोलण्याची संधी मिळते.”

गोगोई पुढे म्हणाले, “दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध स्थगन प्रस्ताव आणला असता तो फेटाळण्यात आला. मात्र, संसदीय कामकाज मंत्री जे कर्नाटकमधील प्रकरणावर चुकीचे आरोप करत होते, त्यांना मात्र संधी देण्यात आली. विरोधी पक्षनेत्यांना बोलण्याची संधी दिली जात नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन हा मुद्दा उपस्थित केला. सध्या सरकार संसदीय परंपरा आणि विरोधी पक्षाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.”

Sambhajiraje chhatrapati : वाघ्या कुत्र्याचा वाद; संभाजीराजेंनी थेट 100 वर्षांपूर्वीचे पुरावेच दाखवले

“राहुल गांधी यांचे विधान योग्य” – शत्रुघ्न सिन्हा

तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी राहुल गांधींच्या विधानाला पाठिंबा दिला. ते म्हणाले, “राहुल गांधी यांनी अगदी बरोबर सांगितले आहे. ते विरोधी पक्षनेते म्हणून केवळ काँग्रेसचेच नव्हे, तर संपूर्ण विरोधी पक्षाचे नेतृत्व करत आहेत. यापूर्वीही त्यांना बोलण्याची संधी नाकारण्यात आली होती, आणि आज पुन्हा तसेच घडले. हे अत्यंत निंदनीय आहे. मी लोकसभा अध्यक्षांचा आदर करतो, पण त्यांच्यावर कोणता दबाव आहे, हे माहित नाही. विरोधी पक्षामध्ये अनेक प्रभावशाली नेते आहेत, त्यांना आवाज उठवण्यापासून रोखले जात आहे.”*

“संसदीय नियमांचे पालन होणे गरजेचे” –लोकसभा अध्यक्ष ओम बिरला

या प्रकरणावर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “सभागृहाच्या शिष्टाचाराचे आणि परंपरांचे पालन करणे सर्व सदस्यांसाठी महत्त्वाचे आहे. काही खासदारांनी संसदीय परंपरांचे पालन केले नाही, अशा अनेक घटना घडल्या आहेत. संसदेमध्ये अनेक पिढ्या काम करत आल्या आहेत. वडील, मुलगी, आई, पत्नी आणि पती असे सदस्य राहिले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी संसदीय नियमांचे पालन करावे आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेस धक्का न लावता शिस्तबद्ध वर्तन करावे, अशी माझी अपेक्षा आहे.”

Web Title: Opposition is not allowed to speak in lok sabha rahul gandhi directly accuses om birla nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 04:53 PM

Topics:  

  • MP Rahul Gandhi

संबंधित बातम्या

हर्षवर्धन सपकाळांचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांना महत्वाचं आवाहन, म्हणाले; आता 272 जागांवर…
1

हर्षवर्धन सपकाळांचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांना महत्वाचं आवाहन, म्हणाले; आता 272 जागांवर…

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्तांची घेतली भेट; केली ‘ही’ मोठी मागणी
2

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्तांची घेतली भेट; केली ‘ही’ मोठी मागणी

Akhilesh Yadav News: ही घ्या पोचपावती…! आरोप प्रत्यारोपांनंतर अखिलेश यादवांनी आयोगाला थेट पुरावेच दाखवले
3

Akhilesh Yadav News: ही घ्या पोचपावती…! आरोप प्रत्यारोपांनंतर अखिलेश यादवांनी आयोगाला थेट पुरावेच दाखवले

निवडणूक आयोग अन् भाजपाविरोधात काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्तारोको आंदोलन
4

निवडणूक आयोग अन् भाजपाविरोधात काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्तारोको आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.