Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 24, 2026 | 05:15 PM
जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Follow Us
Close
Follow Us:
  • जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसची जोरदार तयारी
  • 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर
  • राज्यातील बड्या नेत्यांचा यादीत समावेश
मुंबई : राज्यात नुकतचं महापालिका निवडणुका पार पडल्या. अनेक महापालिकेत काँग्रेसने मोठं यश मिळवले आहे. काँग्रेसने लातुर महापालिकेतही सत्ता मिळवली आहे. महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता काँग्रेसने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, खासदार रजनी पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य नसीम खान, अखिल भारतीय कार्य समितीच्या सदस्या यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमिन पटेल, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार अमित देशमुख, आमदार डॉ. विश्वजित कदम, अनिस अहमद, माजी मंत्री रमेश बागवे, माजी खासदार हुसेन दलवाई, आमदार साजिद खान पठाण, माजी मंत्री वसंत पुरके, माजी आमदार धिरज देशमुख, रामहरी रुपनवर, एम. एम. शेख, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, मुफ्ती हारुन नदवी, शाह आलम शेख, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, अक्षय राऊत व हनुमंत पवार यांचा या यादीत समावेश आहे.

हे सुद्धा वाचा : वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा वरचष्मा, भाजपने टाकला बहिष्कार; विशेष सभेत नेमकं काय घडलं?

चंद्रपूर काँग्रेसध्ये कोणताही वाद नाही – सपकाळ

चंद्रपूरमध्ये पक्षात कोणताच वाद नाही, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात योग्य समन्वय आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय व संवादात कोणतीही अडचण नाही व पुढेही अडचण येणार नाही, असेही सपकाळ यांनी सांगितले.

Web Title: Congress has announced the list of star campaigners for the zilla parishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Congress
  • MP Rahul Gandhi
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Kolhapur News : “महिलांचे अधिकार नाकारण्यात महिलाच पुढे” ; रुपाली चाकणकर यांचं परखड वक्तव्य
1

Kolhapur News : “महिलांचे अधिकार नाकारण्यात महिलाच पुढे” ; रुपाली चाकणकर यांचं परखड वक्तव्य

चंद्रपूर काँग्रेसध्ये कोणताही वाद नाही, महापौर बनवण्यासाठी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
2

चंद्रपूर काँग्रेसध्ये कोणताही वाद नाही, महापौर बनवण्यासाठी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

ZP Election : नेत्यांचे मनोमिलन, कार्यकर्ते संभ्रमात; शिरुर तालुक्यात नेमकं काय घडतंय?
3

ZP Election : नेत्यांचे मनोमिलन, कार्यकर्ते संभ्रमात; शिरुर तालुक्यात नेमकं काय घडतंय?

ZP Election : बेंबळी गटातील इंगळेंची उमेदवारी बाद तर येडशीतून मोरेंची उमेदवारी कायम , निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय
4

ZP Election : बेंबळी गटातील इंगळेंची उमेदवारी बाद तर येडशीतून मोरेंची उमेदवारी कायम , निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.