Photo Credit- Team Navrashtra
रायगड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोरील वाघ्या कुत्र्याच्या प्रतिकृतीचा वाद पुन्हा एकदा उफाळला आहे. माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी रायगडावरील वाघ्या श्वानाच्या अस्तित्वाला कोणतेही ऐतिहासिक पुरावे नाहीत, असा दावा करत, ही प्रतिकृती हटवावी अशी मागणी केली आहे.
संभाजीराजेंनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले असून, ऐतिहासिकदृष्ट्या अचूक आणि पुराव्यांवर आधारित माहितीच गडावर असावी, असे स्पष्ट केले आहे. वाघ्या श्वानाचा उल्लेख ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये आढळत नाही, त्यामुळे त्याच्या प्रतिकृतीला ऐतिहासिक स्मारक म्हणून स्थान देणे चुकीचे असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. याबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत ऐतिहासिक पुरावेही दाखवले आहेत. पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच संभाजीराजे यांनी रायगडाचे 100 वर्षांपूर्वीचे फोटो दाखवले असून त्यावेळी त्या ठिकाणी वाघ्या कुत्र्याची समाधी नसल्याचा पुरावा दाखवला आहे. त्याचवेळी वाघ्या कुत्र्याचं स्मारक कसं उभारलं गेलं, यावरही प्रकाश टाकला आहे.
संभाजीराजे म्हणाले की, ‘1925 च्या आधीचे म्हणजेच समाधीच्या जीर्णोद्धाराच्या आधाचे हे समाधीचे चित्र आहे, या लोकमान्य टिळकांच्या नेतृत्त्वात एक समिती स्थापन केली होती. समितीने समाधीचा जीर्णोद्धार केला, त्यासाठी पुरातत्व खात्यानेही दोन हजार रूपये दिले होते. तत्त्कालीन सरकारनेही पाच हजार रूपये दिले होते आणि इतर शिवभक्तांनीही मदत करून ही समाधी बांधली होती 1026 ला हे स्मारक पुर्ण झाले. वाघ्या कुत्र्याचं हे स्मारक कसं उभ राहिलं .याबाबत अनेक वादविवाद आहेत. वादविवाद हा शब्दही चुकीचा आहे. एका ठिकाणी त्याची नोंद आहे. महाराष्ट्रातील एकाही इतिहासकाराने,मग ते डाव्या विचारांचे असो वा उजव्या विचारसरणीचे. एकाही इतिहासकाराने आपल्याकडे वाघ्या कुत्र्याचे पुरावे आहेत, हे सांगितले नाही. मग प्रश्न निर्माण होतो. शिवाजी महाराजांच्या वेळी कुत्रे होते का, हो ते असूही शकतात.
जी दंतकथा निर्माण झाली राज सन्यासच्या नाटकातून , ज्या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली, त्या नाटकातून हा वाघ्या कुत्रा प्रकट झाला आणि तिथे स्मारक बांधलं गेलं. एकही संदर्भ पाहायला मिळणार नाही. सगळ्या इतिहासकारांना सरकारने एकत्र बोलवाव, मलाही बोलवाव, आणि जे विरोध करत आहेत,त्यांनाही बोलवावं. समोरासमोर आपण बोलू, कुठे पुरावे आहेत. वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाची उंचीसुद्धा शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा उंच आहे. हे कुठल्या शिवभक्ताला आवडेल.
अमेरिकेच्या धमक्यांना इराणचे कडवे उत्तर! भूमिगत मिसाईल शहराचा धक्कादायक VIDEO झाला व्हायरल
हिंदवी स्वराज्यासाठी लाखो मावळ्यांनी बलिदान दिलं आहे.त्यांच्या समाधीचा अजून कुठेही उल्लेख होत नाही, त्यांच्या समाध्या कुठे आहेत. हेही अद्याप माहिती नाही, पण वाघ्या कुत्र्याचं स्मारक उभारले जाते. आता दु्र्दैवाने तिथे इंदुरच्या तुकोजी महाराज होळकरांचा तिथे उल्लेख आहे, की त्यांनी या स्मारकासाठी मदत केली. पण ज्या हिंदवी स्वराज्यासाठी, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, अहिल्यादेवी होळकर असतील, यांच्यासारख्या ज्यांनी स्वराज्यासाठी स्वत:च आयुष्य पणाला लावलं, अशा वेळी तुकोजीराव होळकर महाराज एका कुत्र्याच्या समाधीसाठी कशी मदत करतील. ही तर तुकोजी महाराजांचीच बदनामी झाली.
राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि तुकोजी महाराज हे दोघेही जवळचे मित्र होते. कृष्णाजीराव फिरुजकर लिखित शिवाजी महाराजांचा पहिला ग्रंथ प्रकाशित झाला, त्याची पहिली मराठी आवृत्ती तुकोजी होळकर महाराजांनी विकत घेतली होती. असं असताना ते कुत्र्याच्या समाधीसाठी का मदत करतील असा प्रश्न आहे.आपण वाघ्या कुत्र्याचं स्थलांतर करू शकतो, गडाखाली एखाद्या ठिकाणी चांगल्या जागी त्याचे स्मारक उभे राहू शकते.
माझं पत्र नीट वाचलं तर कळेल की मी सरकारला अल्टिमेटम दिलेलं नाही. राज्यशासनाच्या धोरणानुसार गडकोटांवरील अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश आहेत. हा राज्य सकारचा आदेश आहे. जर वाघ्या कुत्र्याचा एक टक्काही पुरावा नाही. वाघ्या कुत्र्याचं काल्पनिक स्मारक काढलं जावं आणि ते सैंविधानिकरित्या काढलं जावं,अशी माझी इच्छा आहे.