Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागरिकांनो लक्ष द्या ! देशात आजपासून बदलणार ‘हे’ नियम; LPG सिलिंडर हवा असेल तर आता…

पीएनजीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सातत्याने अनेक नियम लागू करत आहे. त्यामुळे, ज्या भागांमध्ये पीएनजी सेवा उपलब्ध आहेत, तेथील ग्राहकांना आता एलपीजीवरून पीएनजीवर स्विच करावे लागेल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 01, 2026 | 07:27 AM
ओटीपी पडताळणीनंतरच मिळेल सिलिंडरची डिलिव्हरी

ओटीपी पडताळणीनंतरच मिळेल सिलिंडरची डिलिव्हरी

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : जर तुम्ही स्वयंपाकासाठी एलपीजी सिलिंडर वापरत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 1 ऑक्टोबरपासून एलपीजी सिलिंडरबाबत काही बदल केले जात आहेत, त्यामुळे काही लोकांना सिलिंडर मिळणार नाहीत. तर इतरांना ते जास्त किमतीत मिळतील. सिलिंडर बुकिंगची पावती दाखवणे आता पुरेसे ठरणार नाही. सिलिंडर डिलिव्हरी अधिक सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

सिलिंडर बुकिंगनंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल, जो सिलिंडर घेताना डिलिव्हरी एजंटला दाखवणे आवश्यक असेल. या प्रणालीचा उद्देश फसवणुकीचे बुकिंग आणि नोंदणीशिवाय होणारी डिलिव्हरी रोखणे हा आहे. सबसिडीसाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण आवश्यक जर तुम्हाला सबसिडी असलेला घरगुती एलपीजी सिलिंडर मिळाला, तर आता बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांना पुढील रिफिल बुक करण्यापूर्वी ती पूर्ण करावी लागेल.

दरम्यान, तुम्ही हे काम गॅस एजन्सी, डिलिव्हरी बॉय किंवा तेल कंपनीच्या अॅपचा वापर करून घरबसल्या पूर्ण करू शकता. तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर करतात. हे दर आंतरराष्ट्रीय इंधनाच्या किमती, गॅस आयातीचा खर्च आणि सरकारी कर यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतात.

रिफिल बुकिंगमध्ये मोठे बदल

केंद्र सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या पुढील रिफिलसाठी बुकिंगचा कालावधी ४५ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत कमी केला आहे. हा नवीन नियम देशातील सर्व घरगुती ग्राहकांना लागू होईल. पूर्वी, २५ दिवसांचा नियम फक्त शहरी भागात राहणाऱ्यांना लागू होता, पण आता हा नियम शहरे, गावे आणि कसब्यांसह सर्वत्र लागू होईल.

पीएनजी कनेक्शनवर कठोरता

पीएनजीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सातत्याने अनेक नियम लागू करत आहे. त्यामुळे, ज्या भागांमध्ये पीएनजी सेवा उपलब्ध आहेत, तेथील ग्राहकांना आता एलपीजीवरून पीएनजीवर स्विच करावे लागेल. सरकारने नोटीस जारी केल्यानंतर ९० दिवसांनी तुमचे एलपीजी कनेक्शन बंद केले जाऊ शकते. म्हणून, जर तुमच्या परिसरात पीएनजी सेवा उपलब्ध असतील, तर तात्काळ कनेक्शन घ्या.

UP Election 2027 : जागावाटपावरून राजकारण तापले ! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Web Title: Otp now mandatory for lpg cylinders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 07:16 AM

Topics:  

  • LPG Gas Price
  • new rules

संबंधित बातम्या

LPG सिलेंडर बुकिंग करताना चूक करू नका! एका लिंकवर क्लिक करताच खातं होऊ शकतं रिकामं
1

LPG सिलेंडर बुकिंग करताना चूक करू नका! एका लिंकवर क्लिक करताच खातं होऊ शकतं रिकामं

ZP Teachers Transfer: जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांबाबत मोठा निर्णय! रुजू न होणाऱ्या शिक्षकांवर होणार…
2

ZP Teachers Transfer: जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांबाबत मोठा निर्णय! रुजू न होणाऱ्या शिक्षकांवर होणार…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.