Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG सिलेंडर बुकिंग करताना चूक करू नका! एका लिंकवर क्लिक करताच खातं होऊ शकतं रिकामं

LPG: LPG गॅस सिलेंडर बुकिंग आणि सबसिडीच्या नावाखाली सायबर भामटे ग्राहकांची फसवणूक करत आहेत. गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचे भासवून ग्राहकांना KYC अपडेट न केल्यास सबसिडी बंद होईल, अशी भीती दाखवली जाते. त्यानंतर WhatsApp किंवा SMS द्वारे बनावट लिंक पाठवून माहिती भरण्यास किंवा APK फाईल डाउनलोड करण्यास सांगितले जाते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 22, 2026 | 03:36 PM
LPG Gas Booking Scam Alert (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

LPG Gas Booking Scam Alert (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  1. LPG बुकिंग आणि सबसिडीच्या नावाने सायबर फसवणूक.
  2. KYC अपडेटच्या बहाण्याने बनावट लिंक आणि APK पाठवले जातात.
  3. फसवणूक झाल्यास 1930 वर तक्रार करा.

LPG Gas Booking Scam Alert: तुमच्या घरी पण LPG गॅस सिलेंडर वापरला जात असेल, तर ऑनलाईन बुकिंग आणि सबसिडीचं काम करताना जरा जास्त सावध राहण्याची गरज आहे. कारण, आता सायबर चोरांनी लोकांना फसवण्यासाठी गॅस सिलेंडर बुकिंग आणि गॅस सबसिडीचा वापर करायला सुरुवात केली. KYC अपडेट करण्याच्या नावाखाली किंवा गॅस सबसिडी बंद होईल अशी भीती दाखवून ग्राहकांना खोटे मेसेज आणि लिंक पाठवल्या जातायत. याबद्दल ICICI बँकेने पण आपल्या ग्राहकांना सावध राहायला सांगितलं. LPG

नेमकी फसवणूक कशी केली जाते?

सायबर भामटे आधी ग्राहकांना फोन करून आपण गॅस एजन्सीमधून बोलतोय असं सांगतात. तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली नाही किंवा लवकर अपडेट नाही केलं तर गॅस सबसिडी बंद होईल, असं सांगून ग्राहकांमध्ये भीती तयार केली जाते. त्यानंतर WhatsApp किंवा SMS ने एक लिंक पाठवली जाते. या लिंकवर क्लिक करून माहिती भरायला सांगितली जाते.

काही वेळा ग्राहकांना KYC अपडेट करण्यासाठी किंवा सबसिडी परत चालू करण्यासाठी APK फाईल डाऊनलोड करायला सांगितली जाते. पण, ही फाईल मोबाईलमध्ये मालवेअर बसवू शकते. त्यामुळे फोनमधली पर्सनल माहिती, बँकिंग डिटेल्स आणि पैशांशी संबंधित डेटा सायबर चोरांच्या हातात लागू शकतो. त्यामुळे, तुमच्या बँक खात्यातले पैसे पण धोक्यात येऊ शकतात.

Bank KYC Fraud Alert: KYC अपडेटच्या नावाखाली बँक खाते साफ! एका चुकीने गमावू शकता आयुष्यभराची कमाई, ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा

फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा

  • गॅस सबसिडी किंवा KYC अपडेटच्या नावाने आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
  • कोणत्याही माणसासोबत OTP, ATM PIN किंवा CVV शेअर करू नका.
  • WhatsApp किंवा SMS वर आलेल्या अनोळखी APK फाईल डाऊनलोड करू नका.
  • गॅस बुकिंग आणि KYC साठी फक्त अधिकृत अॅप किंवा वेबसाईटचाच वापर करा.
  • गॅस एजन्सी किंवा बँकेचा कर्मचारी असल्याचं सांगणाऱ्या अनोळखी माणसाच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका.

ऑनलाईन फसवणूक झाली तर काय करावं?

चुकून सायबर फसवणुकीला बळी पडलात तर घाबरून न जाता लगेच काम करा. पैशांची फसवणूक झालीय हे लक्षात येताच 1930 या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईनवर संपर्क साधा. तसेच cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवा.

Mumbai CNG Price: CNG दरवाढीने मुंबईकरांच्या खिशाला कात्री! आता रिक्षाने प्रवास करणंही महागणार?

लक्षात ठेवा, गॅस सबसिडी किंवा KYC अपडेटच्या नावाने येणारा प्रत्येक मेसेज खरा असेलच असं नाही. त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी तिची खात्री करा. थोडीशी सावधगिरी तुम्हाला मोठ्या पैशांच्या नुकसानापासून वाचवू शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: LPG गॅस बुकिंगच्या नावाखाली फसवणूक कशी केली जाते?

    Ans: सायबर भामटे गॅस एजन्सीचे कर्मचारी असल्याचे सांगून KYC किंवा सबसिडी अपडेटच्या नावाखाली बनावट लिंक पाठवतात.

  • Que: गॅस सबसिडी बंद होण्याचा मेसेज आल्यास काय करावे?

    Ans: घाईने कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. संबंधित गॅस एजन्सीशी अधिकृत माध्यमातून संपर्क साधून माहितीची खात्री करावी.

  • Que: LPG KYC अपडेटसाठी आलेली APK फाईल डाउनलोड करावी का?

    Ans: नाही. अनोळखी व्यक्तीने पाठवलेली APK फाईल डाउनलोड करू नये. त्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते.

Web Title: Lpg gas booking scam fake kyc subsidy cyber fraud alert rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • KYC
  • KYC News
  • LPG
  • LPG gas cylinder
  • LPG Gas Price

संबंधित बातम्या

Bank KYC Fraud Alert: KYC अपडेटच्या नावाखाली बँक खाते साफ! एका चुकीने गमावू शकता आयुष्यभराची कमाई, ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा
1

Bank KYC Fraud Alert: KYC अपडेटच्या नावाखाली बँक खाते साफ! एका चुकीने गमावू शकता आयुष्यभराची कमाई, ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा

Pratap Sarnaik : ढाबे-गोदामांमध्ये गॅसची अवैध उतराई केल्यास खैर नाही! प्रताप सरनाईकांचे कठोर कारवाईचे निर्देश
2

Pratap Sarnaik : ढाबे-गोदामांमध्ये गॅसची अवैध उतराई केल्यास खैर नाही! प्रताप सरनाईकांचे कठोर कारवाईचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.