Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (२२ एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ माजली आहे.या हल्ल्यात महाराष्ट्रातील काही लोक मृत्यूमुखी पडले, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांशी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. याचवेळी या हल्ल्यातून बचावलेल्या काही कुटुंबियांशीही त्यांनी संवाद साधला आहे.
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील कुटुंबियांशी संवाद साधत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मंगळवारी रात्री ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांनी दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या नागपूर आणि पुण्यातील काही पर्यटकांच्या कुटुंबियांशी बोललो आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान या हल्ल्यात नागपूरमधील एक व्यक्ती जखमी झाला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या कुटुंबाच्या बचावाची एक रंजक कहाणीही समोर येत आहे.
१७ एप्रिलपासून हे कुटुंब जम्मू आणि काश्मीरला सहलीसाठी गेले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या नागपूर येथील रूपचंदानी कुटुंबातील सदस्य देवीबाई म्हणाल्या की, तिलक रूपचंदानी, त्यांची पत्नी सिमरन आणि मुलगा १७ एप्रिल रोजी वैष्णोदेवी आणि जम्मू-काश्मीरमधील इतर ठिकाणी तीर्थयात्रेसाठी नागपूरहून निघाले होते आणि २७ एप्रिल रोजी परतणार होते. सरकारने जम्मू-काश्मीरमधील रूपचंदानी कुटुंबातील तीन सदस्यांच्या परतीची व्यवस्था केली आहे आणि ते बुधवारी रात्रीपर्यंत परत येतील अशी अपेक्षा होती.
Pahalgam Terror Attack: किती धोकादायक आहे ‘TRF’ संघटना? दहशतवाद्यांचे लादेन कनेक्शन? वाचा सविस्तर…
टिळक यांचे मोठे भाऊ हरीश रूपचंदानी म्हणाले, मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते पहलगाममध्ये होते. हल्ल्यावेळी आमचे कुटुंब टेकडीवर पर्यटनाचा आनंद घेत होते. पण अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू आला, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्याने संपूर्ण कुटुबियांनी टेकडीवरून खाली उडी मारली. यात सिमरनाच पाय मोडला.
पहलगाममध्ये गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर नागपूर कुटुंबाने टेकडीवरून उडी मारल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे. यादरम्यान सिमरन रूपचंदानीचा पाय घसरली आणि तिच्या पायाचे हाड तुटले. तिलक आणि गर्भ रूपचंदानी सिमरनसोबत आहेत आणि सर्वजण सुरक्षित आहेत. आपण कुटुंबियांशी संपर्क साधला आहे. शक्य तेवढी सर्व मदत पुरवली जात आहे, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं आहे.
हरीश म्हणाले की, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते डॉ. विंकी रुघवानी यांनी त्यांना काश्मीरमधील त्यांच्या भावाच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यास मदत केली आणि त्यांनी बुधवारी सकाळी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्याशी बोलले. माझ्या भावाचे कुटुंब सुरक्षित आहे आणि आज रात्री परततील.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची नागरी उड्डाण मंत्र्यांशी चर्चा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील सहा जणांचे मृतदेह परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे.
#WATCH | #PahalgamTerroristAttack | Nagpur: Family member of one of the tourists from Nagpur, says, “We got the information from the television and we got worried after that. The last time we contacted each other was on April 17. We are very worried, but got relief after seeing… pic.twitter.com/Aar7hBIwvU
— ANI (@ANI) April 23, 2025