टीआरएफ दहशतवादी संघटनेचे लादेन कनेक्शन जाणून घ्या (फोटो- istockphoto/सोशल मिडिया)
श्रीनगर: काल पहलगाम येथे सैनिकी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर हल्ला केला होता. यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. काही पर्यटक महाराष्ट्रातील देखील या घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान काल झालेल्या हल्ल्याची जबाबदारी टिआरएफने स्वीकारली आहे. टीआरएफ (द रेजिडेंट फ्रंट) ही पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा असल्याचे मानले जाते. दरम्यान या दहशतवादी संघटनेबद्दल जाणून घेऊयात.
इंडियन मुजाउद्दीन आणि लष्कर ए तोयबा यांच्यामधून टीआरएफ दहशतवादी संघटना तयार करण्यात आली आहे. या संघटनेचे काम काश्मीरमधील युवकांना सीमारेषेच्या पलीकडे पाठवून त्यांना गोरील्ला लढाईचे ट्रेनिंग देणे हे आहे. टीआरएफच्या संस्थापकांमध्ये हाफिज मुहम्मद सईद, झकीउर रहमान लखवी आणि काश्मीरचे रहिवासी शेख सज्जाद गुल यांचा समावेश आहे.
शेख सज्जाद गुलचा जन्म १९७४ मध्ये श्रीनगरमध्ये झाला होता. श्रीनगरमध्ये सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, सज्जादने बंगळुरूच्या एशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची पदवी देखील मिळवली. पण २००१ मध्ये तो लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या जवळ आला. टीआरएफ सध्या सज्जाद चालवत आहे. सज्जाद हा दहशतवादी हाफिज सईदचा उजवा हात मानला जातो. याच संघटनेने काल पहलगाम येथील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट तर…
सज्जादच्या नेतृत्वात टीआरएफने अनेक हल्ले घडवून आणले आहेत. २०२० मध्ये भाजप नेत्याची हत्या व २०२३ मध्ये काश्मिरी पंडितांची हत्या, तसेच २०१९ च्या पुलवामा हल्ल्यात देखील टीआरएफचे नाव समोर आले होते. टीआरएफचे दहशतवादी अनेक बाबतीत इतर दहशतवादी संघटनांपेक्षा वेगळे आहेत. येथील लोक जास्त स्थानिक आणि कमी धार्मिक दिसतात. त्यामुळे एजन्सीचे त्यांच्याकमी कमी प्रमाणात लक्ष जात असे म्हटले जाते.
लादेनशी काय आहे कनेक्शन?
टीआरएफ या दहशतवादी संघटनेचे ओसामा बिन लादेनशी देखील संबंध असल्याचे म्हटले जाते. टीआरएफचे जगातील सर्वात मोठा दहशतवादी आणि अल कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेनशी चांगले संबंध होते. लादेनने त्याच्या हयातीत अनेक दहशतवादी संघटना स्थापन करण्यास मदत केली. ज्यामध्ये लष्कर-ए-तैयबा देखील एक संघटना आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई, दिल्ली आणि देशातील महत्वाच्या शहरांसह कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट देण्यात आला आहे. महत्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पुण्यात देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.