Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण आहे दहशतवादी फरहातुल्ला घोरी? भारतातील रेल्वे बॉम्बने उडवण्याची दिली धमकी 

पाकिस्तानमध्ये जिहाद घोरी यांने पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या स्लीपर सेलच्या मदतीने बंगळुरुच्या रामेश्वरम कॅफेच बॉम्बस्फोटाचा कट रचला होता. कोण आहे दहशतवादी फरहातुल्ला घोरी?

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 28, 2024 | 01:07 PM
कोण आहे दहशतवादी फरहातुल्ला घोरी? भारतातील रेल्वे बॉम्बने उडवण्याची दिली धमकी (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

कोण आहे दहशतवादी फरहातुल्ला घोरी? भारतातील रेल्वे बॉम्बने उडवण्याची दिली धमकी (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून भारतीय सुरक्षा यंत्रणा हाय अलर्ट मोडवर आहे. एका व्हिडिओमध्ये दहशतवादी फरहातुल्ला घोरी भारतात स्लीपर सेलच्या माध्यमातून देशभरातील रेल्वेवर हल्ले करण्याबाबत बोलत आहे. भारतात फरारी घोषित झाल्यानंतर घोरी पाकिस्तानात राहत आहे. त्यानेच पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) च्या मदतीने बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये स्लीपर सेलद्वारे स्फोटाची योजना आखली होती.

एका वृत्तपत्रानुसार दहशतवादी फरहातुल्ला घोरी याने स्लीपर सेलच्या मदतीने भारतातील रेल्वे नेटवर्क रुळावरून उतरवण्याचे आवाहन केले आहे. या व्हिडिओमध्ये तो प्रेशर कुकर वापरून बॉम्बचा स्फोट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल बोलताना दिसत आहे. तो वर्षानुवर्षे भारतीय एजन्सीच्या रडारवर होता.

व्हिडिओमध्ये पेट्रोल आणि गॅस पाइपलाइन उडवण्याबाबत बोलत आहे. अनेक हिंदू नेतेही त्यांचे लक्ष्य आहेत. व्हिडिओमध्ये तो म्हणत आहे की भारत सरकार अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि राष्ट्रीय गुप्तचर संस्था (एनआयए) मार्फत त्यांच्या मालमत्तांना लक्ष्य करून स्लीपर सेल कमकुवत करत आहे. “पण आम्ही परत येऊ आणि सरकारला हादरवून टाकू,” असं घोरीने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुप्तचर संस्थांच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, हा व्हिडिओ तीन आठवड्यांपूर्वी टेलिग्रामवर प्रसिद्ध झाला होता.

01 मार्च रोजी रामेश्वरममध्ये झालेल्या स्फोटात किमान 10 जण जखमी झाले होते. एनआयएने 3 मार्च रोजी या प्रकरणाचा ताबा घेतल्यानंतर 12 एप्रिल रोजी दोन मुख्य आरोपी अब्दुल मतीन अहमद ताहा आणि मुसावीर हुसेन शाजिब यांना अटक केली होती. ताहा हा या स्फोटाचा मास्टरमाईंड होता. शाजिबने कॅफेमध्ये आयईडी ठेवला होता. दोघांना कोलकाताजवळील एका लॉजमधून अटक करण्यात आली. दोघेही इस्लामिक स्टेट (IS) मॉड्यूलचे सदस्य आहेत. याच मॉड्यूलचा सदस्य असलेल्या शारिकने नोव्हेंबर २०२२ मध्ये मंगळुरूमध्ये स्फोट घडवून आणला होता.

फरहातुल्ला घोरी आणि त्यांचा जावई शाहिद फैसल यांचे दक्षिण भारतात स्लीपर सेलचे मजबूत नेटवर्क आहे. फैसल रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील दोन्ही आरोपींच्या संपर्कात होता आणि या प्रकरणाचा तो हँडलर होता.

कोण आहे फरहातुल्ला घोरी?

फरहतुल्ला घोरीला अबू सुफयान, सरदार साहेब आणि फारू या नावानेही ओळखले जाते. अनेक हाय-प्रोफाइल हल्ल्यांशी त्याचा संबंध आहे. 2002 मध्ये गुजरातमधील अक्षरधाम मंदिर हल्ल्यातही त्याचा हात होता. या हल्ल्यात 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता तर 80 जण जखमी झाले होते. २००५ मध्ये हैदराबादमधील टास्क फोर्सच्या कार्यालयावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यामागेही त्याचा हात होता.

दिल्ली पोलिसांनी गेल्या वर्षी राष्ट्रीय राजधानी आणि उत्तर प्रदेशमधून तीन मोस्ट-वॉन्टेड दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर, घोरी ऑनलाइन जिहादी भरती आयोजित करत असल्याचे सांगितले होते. घोरी हा दहशतवाद्यांचा हस्तक असल्याचे पोलिसांनी उघड केले. पुणे – ISIS मॉड्यूलच्या अनेक दहशतवाद्यांना देशभरातून अटक करून दिल्ली पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी घोरीचे नाव रेकॉर्डवर घेतले होते. आयएसआय भारतात स्लीपर सेल चालवत असून हल्ले करण्यासाठी तरुणांची भरती करत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी त्यावेळी केला होता.

Web Title: Pakistan based terrorist farhatullah ghori calls on jihadis to carry out train derailments in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 01:07 PM

Topics:  

  • pakistan

संबंधित बातम्या

NOTAM : आधुनिक युद्धाची पहिली लाट भारतावर? चीन आणि पाकिस्तानने सुरु केले ‘असे’ इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध
1

NOTAM : आधुनिक युद्धाची पहिली लाट भारतावर? चीन आणि पाकिस्तानने सुरु केले ‘असे’ इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध

पाकिस्तानातील महागाईचा नवा उच्चांक! Swift ची किंमत 44 लाखांवर तर Toyota Fortuner ची किंमत कोटींमध्ये
2

पाकिस्तानातील महागाईचा नवा उच्चांक! Swift ची किंमत 44 लाखांवर तर Toyota Fortuner ची किंमत कोटींमध्ये

ती एक चूक आणि पाकिस्तान झाला बदनाम! बिझनेसच्या बातमीत छापला ChatGPT चा प्रॉम्प्ट, जगभरातील युजर्सनी उडवली खिल्ली
3

ती एक चूक आणि पाकिस्तान झाला बदनाम! बिझनेसच्या बातमीत छापला ChatGPT चा प्रॉम्प्ट, जगभरातील युजर्सनी उडवली खिल्ली

RuleOfLaw : पाकिस्तानची न्यायव्यवस्था ढवळून निघाली; 27 व्या घटनादुरुस्तीवर संतापलेल्या दोन वरिष्ठ न्यायाधीशांचा राजीनामा
4

RuleOfLaw : पाकिस्तानची न्यायव्यवस्था ढवळून निघाली; 27 व्या घटनादुरुस्तीवर संतापलेल्या दोन वरिष्ठ न्यायाधीशांचा राजीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.