
Mumbai's Veeransh Bhanushali takes a dig at Pakistan at Oxford Union
Viransh Bhanushali Oxford Union speech viral video : जागतिक स्तरावर वादविवादासाठी अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘ऑक्सफर्ड युनियन’मध्ये पुन्हा एकदा एका भारतीय तरुणाने तिरंग्याची शान उंचावली आहे. मुंबईत जन्मलेला कायद्याचा विद्यार्थी वीरांश भानुशाली याने भारत-पाकिस्तान संबंधांवर (india pakistan war) केलेल्या रोखठोक भाषणाने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की केली आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणावर वीरांशने डागलेले तोफगोळे ऐकून तिथे उपस्थित असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या.
ऑक्सफर्ड युनियनमध्ये चर्चेचा विषय होता, ‘भारताचे पाकिस्तानबद्दलचे धोरण हे केवळ लोकप्रियतेवर आधारित सुरक्षा धोरण आहे.’ या प्रस्तावाचा विरोध करताना वीरांशने अत्यंत ताकदीचे मुद्दे मांडले. तो म्हणाला, “हा वाद जिंकण्यासाठी मला कोणत्याही भडक विधानाची गरज नाही, मला फक्त एक कॅलेंडर हवे आहे.” त्याने आठवण करून दिली की, २६/११ च्या भीषण हल्ल्यानंतर तत्कालीन भारताने प्रचंड संयम पाळला होता. जर भारताला केवळ लोकप्रियता हवी असती, तर त्याच वेळी युद्ध पुकारले असते. पण भारताने शांततेचा आणि राजनैतिक मार्गाचा अवलंब केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Christmas 2025: केवळ फॅशन नाही तर बिझनेस मास्टरस्ट्रोक; सांताक्लॉजच्या खरं तर ‘Coca-Cola’ मुळे मिळाला लाल ड्रेस
ऑक्सफर्ड युनियनचे अध्यक्ष मुसा हराज (जे मूळचे पाकिस्तानात जन्मलेले आहेत) यांनी जेव्हा भारताच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तेव्हा वीरांशने त्यांना आरसा दाखवला. वीरांश म्हणाला, “भारताने पठाणकोट, उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर दिलेली प्रत्युत्तरे ही राजकीय गणिते नव्हती, तर ती धोरणात्मक गरज होती. स्वतःच्या नागरिकांचे संरक्षण करणे याला तुम्ही लोकप्रियता म्हणत असाल, तर हो, मी लोकप्रियतावादी आहे.” त्याने स्पष्ट केले की, भारताने दिलेली ही उत्तरे कधीही निवडणुकीच्या चक्राशी संबंधित नव्हती, तर ती सीमेपलीकडून येणाऱ्या रक्ताळलेल्या खेळाला दिलेले चोख प्रत्युत्तर होते.
“This House Believes That India’s Policy Towards Pakistan Is a Populist Disguise for Security Policy.” Viraansh Bhanushali, a law student from Mumbai at the University of Oxford, delivered a compelling opposition speech in the Oxford Union debate on the motion “This House… pic.twitter.com/RWbAw5MfOv — Augadh (@AugadhBhudeva) December 22, 2025
credit : social media and Twitter
भाषणातील सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे पाकिस्तानची नैतिकतेवरून केलेली खरडपट्टी. वीरांशने ठणकावून सांगितले की, जो देश स्वतः दहशतवाद्यांना आश्रय देतो, तो देशाला शांततेचे आणि नैतिकतेचे धडे देऊ शकत नाही. पठाणकोट आणि पुलवामाचा संदर्भ देत तो म्हणाला, “ज्या देशाला स्वतःची कोणतीही लाज उरलेली नाही, त्या देशाला तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी लाजवू शकत नाही.” हे वाक्य ऐकताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
आतंकवाद के खिलाफ भारत की सख्त नीतियों के खिलाफ प्रपंच फैलाने वालों को विरांश भानुशाली ने ऑक्सफ़ोर्ड के मंच से लगाई लताड़ कहा- ऑक्सफोर्ड के बंद और सुरक्षित कमरों में बैठकर सुरक्षा नीतियों पर नुक्ताचीनी करना बेहद ही आसान है। लेकिन वास्तविक धरातल पर आतंकवाद एक भेड़िए के रूप ने… pic.twitter.com/fi6A12l3Ca — ऑपइंडिया (@OpIndia_in) December 24, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Social Change: अजब देश! प्रेयसीला डेट करण्यासाठी सरकार देतंय 31 हजार रुपये; लग्न केल्यास मिळतात 25 लाख, जाणून घ्या नेमकं कारण
एक मुंबईकर म्हणून वीरांशने २६/११ च्या हल्ल्याचा संदर्भ देताना अत्यंत भावूक आणि प्रभावी मांडणी केली. हजारो भारतीयांनी दहशतवादाचा जो दंश सोसला आहे, त्याची जाणीव त्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर करून दिली. “जर तुम्हाला खरोखरच सुरक्षेच्या नावाखाली ‘पॉप्युलिझम’ पाहायचा असेल, तर रॅडक्लिफ रेषेच्या पलीकडे (पाकिस्तानमध्ये) पहा,” असे म्हणत त्याने पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणावरही निशाणा साधला. वीरांश भानुशालीच्या या भाषणाने हे सिद्ध केले आहे की, भारतीय तरुण आज जागतिक व्यासपीठावर केवळ भारताची बाजू मांडत नाहीत, तर जगाला सत्य सांगण्याची हिंमतही ठेवतात.
Ans: वीरांश भानुशाली हा मूळचा मुंबईचा असून तो ऑक्सफर्डमध्ये कायद्याचे शिक्षण घेत असलेला भारतीय विद्यार्थी आहे.
Ans: विषयाचे नाव होते - 'हाऊसचा असा विश्वास आहे की भारताचे पाकिस्तान धोरण हे सुरक्षेपेक्षा लोकप्रियतेवर आधारित आहे.'
Ans: त्याने सांगितले की भारताच्या कृती केवळ स्वरक्षणासाठी आहेत आणि "ज्या देशाला लाज नाही, त्याला कुणी लाजवू शकत नाही."