Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Sindoor : भारताच्या हवाई हल्ल्यात AWACS चं मोठं नुकसान; अखेर ब्रह्मोसचा वापर झाल्याची पाकिस्तानची कबुली

भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या महत्त्वाच्या AWACS (एअरबॉर्न वॉर्निंग अ‍ॅण्ड कंट्रोल सिस्टम) चं मोठं नुकसान झालं आहे, अशी कबुली पाकिस्तानचे निवृत्त एअर मार्शल मसूद अख्तर यांनी दिली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: May 16, 2025 | 08:34 PM
भारताच्या हवाई हल्ल्यात AWACS चं मोठं नुकसान; अखेर ब्रह्मोसचा वापर झाल्याची पाकिस्तानच्या कबुली

भारताच्या हवाई हल्ल्यात AWACS चं मोठं नुकसान; अखेर ब्रह्मोसचा वापर झाल्याची पाकिस्तानच्या कबुली

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या महत्त्वाच्या AWACS (एअरबॉर्न वॉर्निंग अ‍ॅण्ड कंट्रोल सिस्टम) चं मोठं नुकसान झालं आहे, अशी कबुली पाकिस्तानचे निवृत्त एअर मार्शल मसूद अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दहशतवाद्यांना ठेचणारचं! जम्मू-काश्मीरमध्ये इंडियन आर्मी ‘ऑन फायर’ मोडमध्ये; 6 जणांना दाखवले अस्मान

“भारतीय सैन्याने सलग चार ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रक्षेपित केली. मात्र ती जमिनीवरून किंवा हवाई मार्गे आली हे स्पष्ट नाही,” असं मसूद अख्तर यांनी म्हटलं आहे. “आमचे वैमानिकांनी विमानाकडे धाव घेतली मात्र, पण क्षेपणास्त्र येतच राहिली. शेवटचे चौथे क्षेपणास्त्र थेट भोलारी हवाई तळावर असलेल्या हँगारवर आदळले. तिथे तैनात असलेल्या AWACS विमानचं नुकसान झालं आहे.”, असंही त्यांनी म्हटलं आहे.

BREAKING- Ex PAF chief admits that Pak has lost a PAF Awacs in Bholari strike

Biggest prized asset of PAF taken down in Op Sindoorpic.twitter.com/hTgV19F6aa

— Frontalforce 🇮🇳 (@FrontalForce) May 15, 2025

ही मुलाखत Frontal Force या संघर्ष निरीक्षण करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आली होती. याआधी, भारताचे एअर मार्शल एके भारती यांनी देखील याची पुष्टी केली होती की, केवळ तीन तासांच्या आत पाकिस्तानच्या ११ हवाई तळांवर हल्ले करण्यात आले. भारताने अचूक आणि मोजके हल्ले करून पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेला जबरदस्त धक्का दिला आहे.

ऑपरेशन सिंदूर हे २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी करण्यात आले होते. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने चकलाला, रफिक, राहिम यार खान येथील लष्करी तळांवर हल्ले केले. त्यानंतर सरगोधा, भोलारी आणि जेकबाबाद येथेही लक्ष्य केले गेले. या कारवाईत रडार केंद्रे, कमांड सेंटर्स आणि शस्त्रसाठ्याच्या गोदामांवर हल्ले करण्यात आले.

India- Pakistan conflict: सीमेपलीकडे नेमकं काय झालं? पाकिस्तानी रेंजर्सच्या जाळ्यात अडकलेले पूर्णम शॉंनी सांगितली आपबीती

पाकिस्तानच्या लष्कराकडून या हल्ल्यांमध्ये झालेल्या नुकसानीचे महत्त्व कमी दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र मसूद अख्तर यांची ही सामान्यजनांसमोर आलेली थेट कबुली आता त्या अधिकृत निवेदनाला छेद देणारी ठरत आहे. ही घटना दोन्ही देशांतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घडली असून, भारताने आपल्या भूमिकेवर ठाम राहून स्पष्ट केले आहे की, आक्रमकता सहन केली जाणार नाही.

Web Title: Pakistan ex air marshal admits awacs damaged in indian air force attack during operation sindoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 08:29 PM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • india pakistan war
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन
1

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
2

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
3

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल
4

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.