जम्मू काश्मीरमध्ये 6 दहशतवादी ठार (ani)
श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. मात्र पाकिस्तान अजून सुद्धरण्याचे नाव घेताना दिसून येत नाहीये. पाकिस्तानकडून भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया अजूनही सुरूच आहेत. भारत पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली आहे. मात्र भारतीय लष्कर अजूनही सतर्क आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा अजूनही शोध सुरू आहे. मात्र भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे.
भारतीय लष्कराने गेल्या दोन दिवसांत 6 दहशतवाद्यांना ठार मारले आहे. जैश-ए-मोहम्मदच्या जिल्हा कमांडरला ठार मारले आहे. दहशतवाद्यांचे ठिकाणे देखील उद्ध्वस्त झाले आहेत. दरम्यान लष्कर ए तोयबचे देखील तीन दहशतवादी ठार झाले आहेत. युद्धबंदी झाली असली तरी देखील ऑपरेशन सिंदूर किंवा लष्करी कारवाई थांबवलेली नाही. जम्मू काश्मीरमध्ये अजूनही लष्करी कारवाई सुरूच आहे. अनेक भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती प्राप्त झाली असल्याने लष्कराने परिसराला वेढा घातला आहे.
#WATCH | Srinagar | On anti-terror operations in Kelar & Tral areas, Maj Gen Dhananjay Joshi, GOC V Force, says, "On 12th May, we got information on the possible presence of a terrorist group in the higher reaches in Kelar. On the morning of 13th May, on detection of some… pic.twitter.com/Pg8M6dIxIP
— ANI (@ANI) May 16, 2025
या लष्करी कारवाईबाबत काश्मीरचे पोलिस महानिरक्षक यांनी यात्रकर परिषद घेत माहिती दिली. मागील 48 तासांमध्ये आम्ही दोन मोठी ऑपरेशन्स पूर्ण केली आहेत. ही ऑपरेशन शोपीया आणि त्राल सेक्टरमध्ये करण्यात आले आहे. यांच्या जवानांनी एकूण 6 दहशतवाद्यांना ठार मारले आहे. दहशतवाद्यांची ईकोसिस्टिम उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे पोलिस महानिरीक्षक यांनी सांगितले.
ऑपरेशन सिंदूरनंतर देखील पाकिस्तान सुधरेना
जम्मू-काश्मीरमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली आहे. या चकमकीत शूर जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ठार मारण्यात आलेले तीन दहशतवादी हे लष्कर ए तोयबाचे असल्याचे समजते आहे.
Jammu-Kashmir: ऑपरेशन सिंदूरनंतर देखील पाकिस्तान सुधरेना! लष्कराने घातले तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
शोपियामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
दक्षिण काश्मीरच्या शोपीया जिल्ह्यात तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या तीन दहशतवाद्यांनी मोठे नुकसान करण्याचे ठरवले होते. मात्र सुरक्षा दलांनी त्यांना घेरले. त्यानंतर झालेल्या चकमकीत या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर देखील पाकिस्तान सुधारला नसल्याचे दिसून येत आहे. दहशतवादी भारतात पाठवण्याचे सत्र अजूनही थांबलेले दिसत नाहीये. त्यामुळे पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कर सीमेवर अत्यंत सतर्क झाले आहे.