Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानची उडाली घाबरगुंडी! LOC वरून पाक रेंजर्सची माघार? सीजफायरला भारताचे जोरदार प्रत्युत्तर

भारताने ज्या पद्धतीने आक्रमक पावले उचलली आहेत, त्यामुळे पाकिस्तानची पळता भुई थोडी अशी स्थिती झाली आहे.  भारत पाकिस्तानवर हल्ला करेल अशी भीती पाक सरकारला वाटत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 30, 2025 | 06:02 PM
पाकिस्तानची उडाली घाबरगुंडी! LOC वरून पाक रेंजर्सची माघार? सीजफायरला भारताचे जोरदार प्रत्युत्तर

पाकिस्तानची उडाली घाबरगुंडी! LOC वरून पाक रेंजर्सची माघार? सीजफायरला भारताचे जोरदार प्रत्युत्तर

Follow Us
Close
Follow Us:

श्रीनगर: गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीरच्या पहलगामच्या बैसरन् खोऱ्यात दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. त्यामध्ये 28 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यानंतरभारत सरकार आणि भारतीय सुरक्षा दले चांगलेच आक्रमक झाले आहेत. पहलगाम हल्ल्यातील आणि संपूर्ण दहशतवाद्यांचा बीमोड करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. यामध्ये सैन्य दलांना फ्री हँड देखील देण्यात आला आहे. त्यातच आता पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे.

भारताने ज्या पद्धतीने आक्रमक पावले उचलली आहेत, त्यामुळे पाकिस्तानची पळता भुई थोडी अशी स्थिती झाली आहे.  भारत पाकिस्तानवर हल्ला करेल अशी भीती पाक सरकारला वाटत आहे. त्यामुळे त्यांचे सैन्य दले सतर्क झाली आहेत. भीतीपोटी पाकिस्तान एलओसीवर सीजफायरचे उल्लंघन करत आहे. भारत देखील याला जोरदार प्रत्युत्तर देत आहे.

पाकिस्तानी रेंजर्स सीमेवर गोळीबार करतआहेत. त्याला भारतीय लष्कर सडेतोड प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे पाकिस्तानचे सैन्य घाबरले असल्याचे म्हटले जातआहे. सीमेवरील काही चौक्या पाकिस्तानी रेंजर्सने सोडले असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानने आपल्या चौक्यांवरील पाकिस्तानचे झेंडे देखील उतरवले असल्याचे म्हटले जात आहे.

सीमेवर 20 चेकपोस्टवर भारतीय लष्कर व पाकिस्तानी रेंजर्स यांच्यात धुमश्चक्री झाल्याचे म्हटले जात आहे. भारताकडून कोणत्याही क्षणी हल्ला होईल अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. त्यामुळे पाकिस्तानने लाहोर आणि इस्लामाबादमध्ये नो फ्लाय एअर झोन घोषित केला आहे.

LOCवर गोळीबार, भारतीय सैन्यानेही दाखवली ताकद

पहलगाम हल्ल्याची आग विझलेली नसताना पाकिस्तानकडून अजूनही कुरापती सुरूच आहेत. पहमगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तानच्या सीमेतून गोळीबार झाला होता. त्यानंतर काल पुन्हा पाकिस्तानने काश्मीर खोऱ्यातील नियंत्रण रेषेवर (LoC) कोणत्याही प्रकारची चिथावणी न देता गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत त्यांना परतून लावले.

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबेनात; LOCवर गोळीबार, भारतीय सैन्यानेही दाखवली ताकद

भारतीय सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरूच

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांकडून सातत्याने ऑपरेशन्स सुरूच आहे. पहलगाम हल्ल्यानंतर हल्ल्यात सामील असलेल्या या दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली. नुकतीच सुरक्षा दलांनी खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांची आणखी दोन घरे उद्ध्वस्त करण्यात आली. भारतीय सैन्याकडून लष्कर ए तैयबाचा दहशतवादी एहसान अहमद शेखचे दुमजली घर स्फोटके लावून उडवून दिले. एहसान अहमद शेख जून २०२३ पासून लष्करचा सदस्य होता आणि तो पुलवामामधील मुरानचा रहिवासी आहे.

Web Title: Pakistan rangers retreat due to indian armys aggressive stance leaving checkposts abandoned after pahalgam terror attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 05:59 PM

Topics:  

  • India vs Pakistan
  • indian army
  • Indian government
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

WCL 2025 : या एका खेळाडूच्या कृत्यामुळे भारताने WCL 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला नाही, मोठे सत्य आलं समोर
1

WCL 2025 : या एका खेळाडूच्या कृत्यामुळे भारताने WCL 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला नाही, मोठे सत्य आलं समोर

Independence Day 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण; देशवासियांना दिल्या शुभेच्छा
2

Independence Day 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण; देशवासियांना दिल्या शुभेच्छा

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल
3

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल

७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लष्कराने घेतली विशेष खबरदारी! नियंत्रण रेषेवर ‘३-स्तरीय सुरक्षा कवच’ तयार; शत्रूंसाठी ठरणार ‘काळ’
4

७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लष्कराने घेतली विशेष खबरदारी! नियंत्रण रेषेवर ‘३-स्तरीय सुरक्षा कवच’ तयार; शत्रूंसाठी ठरणार ‘काळ’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.